scorecardresearch

“गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना रथयात्रेत दंगली व्हायच्या, एकदा तर…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

अमित शाह यांनी “गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता होती त्या काळात रथयात्रेत दंगली व्हायच्या,” असा गंभीर आरोप केला आहे.

Amit Shah in Gujrat
अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शाह यांनी “गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता होती त्या काळात रथयात्रेत दंगली व्हायच्या,” असा गंभीर आरोप केला आहे. तसेच एकदा तर महाप्रभु रथावरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा अमित शाह यांनी केला. ते गुजरातमध्ये गांधीनगर येथील एका सभेत बोलत होते.

अमित शाह म्हणाले, “गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना रथयात्रेत दंगली व्हायच्या. एकदा तर महाप्रभु रथावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, भाजपा सरकारच्या काळात नरेंद्र मोदींपासून आज भूपेंद्र पटेल यांच्या कार्यकाळापर्यंत गुजरातमध्ये रथयात्रेवर एक दगड फेकण्याची कुणीही हिंमत केली नाही.”

हेही वाचा : अमित शहांशी सख्य नसल्याने बिघडले मुख्यमंत्रीपदाचे गणित ?

अमित शाह रथयात्रेत देखील सहभागी होणार आहेत. त्यांनी गुरुवारी (३० जून) १४५ व्या जगन्नाथ रथयात्रेनिमित्त जगन्नाथ मंदिरात आरती केली. याआधी अमित शाह यांनी श्री स्वामीनारायण विद्यापीठाच्या प्रवेश इमारतीचं उद्घाटन केलं आणि ७५० बेडच्या रुग्णालयाचं भूमिपूजन केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit shah allege riots in rath yatra in gujrat under congress rule pbs

ताज्या बातम्या