पीटीआय, ढेकाजोळी

“गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने आसाममधील घुसखोरी थांबवली आहे. मात्र हे पुरेसे नसून पुढील पाच वर्षांत सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवले जाईल,” असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आसामच्या बाेंगाईगाव जिल्ह्यातील धुबरी परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.

गृहमंत्री शहा म्हणाले, ‘१० वर्षांपूर्वी आम्ही आसाममध्ये घुसखोरी थांबवण्याचे वचन दिले होते आणि ते पूर्ण केले. पण आता प्रत्येक बेकायदेशीर स्थलांतरिताला बाहेर पाठवणे आवश्यक आहे.’ त्यांनी आरोप केला की, घुसखोरांमुळे स्थानिक आसामी युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्या सरकारने १.२५ लाख एकर अतिक्रमित जमिनी मुक्त केल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, पुढील काळात राज्यातील एकही जमीन अतिक्रमणाखाली राहणार नाही.