Amit Shah cancels Maharashtra poll rallies: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. १८ तारखेला सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यासाठी रविवार आणि सोमवारी जोरदार प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष सभा आणि मिरवणुकांचे आयोजन करत आहेत. अशावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र आपला प्रचार आधीच थांबविला आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसाळला असून परिस्थिती चिघळल्यामुळे अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांची हत्या झाल्यानंतर परस्थिती चिघळली आहे. त्यामुळे अमित शाह दिल्लीकडे रवाना झाले.

हे वाचा >> मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले

Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी

नागपूर जिल्ह्यातील चारही सभा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेरसह विदर्भात गडचिरोली व वर्धा या ठिकाणी जाहीर सभा घेणार होते. १५ नोव्हेंबरला विदर्भात त्यांची यवतमाळ मातदार संघात उमरेखड येथे व चंद्रपूर जाहीर सभा होती . ती झाल्यानंतर रविवारी १७ नोव्हेंबरला त्यांची गडचिरोलीसह वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काटोल व सावनेर येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अमित शहा यांचे शनिवारी रात्री नागपुरात आगमन झाले.त्यांचा खाजगी हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्या ठिकाणी रात्री त्यांनी विदर्भातील काही भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. रविवारी सकाळी काटोल मतदार संघात चरणसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी व त्यानंतर सावनेर मतदार संघात आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी सकाळी १०.३० वाजता निघणार होते. त्यानंतर गडचिरोली आणि वर्धा येथे जाहीर सभा घेणार होते मात्र रविवारी सकाळी शहा यांच्या विदर्भातील चारही सभा झाल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार

शनिवारपासून मणिपूरमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकारी जमावाने एका वरीष्ठ मंत्र्यांसह भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या घराबाहेर आग लावल्या आहेत. सुरक्षा दल राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेतीची परिस्थिती राखण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही.

शाहांऐवजी चौहान, स्मृती इराणी

सावनेर आणि काटोलमध्ये अमित शाह यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील दोन्ही सभा घेऊन ते गडचिरोलीला रवाना होणार होते. मात्र तेथील सभा रद्द झाल्याने आता त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहाण आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सभा घेणार आहे. काटोल व सवनेरमध्ये शिवराज सिंग चव्हाण आणि गडचिरोली व वर्धा येथे स्मृती इराणी सभा घेणार असल्याची माहिती भाजपाने दिली.

Story img Loader