नवी दिल्ली : देशातील जनता ही भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे २०२९ मध्ये पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार राहावे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

काँग्रेस ज्या प्रकारच्या नकारात्मक राजकारणात गुंतली आहे, त्याचा त्यांना काहीही फायदा होणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी मुख्य निवडणूक ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले आहे. सीजेपी तसेच विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर

टीका केली. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा आल्यापासून पक्ष निवडणुकीत सातत्याने पराभूत होत असल्याचे शहा यांनी नमूद केले. काँग्रेस दशकापासून निवडणुकीत अपयशी होत आहे. मग हा ‘एसआयआर’चा परिणाम आहे का, असा प्रश्न शहांनी विचारला. ‘एसआयआर’ २०२४ नंतर लागू झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. घुसखोरांचा मतदार यादीत समावेश करायची राहुल गांधी यांची योजना जनतेला ठाऊक असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.