Amit Shah In Parliament Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत.

उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री भाष्य करणार असल्याने ते नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
atul londhe
 ‘नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा’; पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा
Live Updates

Parliament Session : ओवैसींवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री भाष्य करणार असल्याने ते नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

15:41 (IST) 7 Feb 2022
राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

14:52 (IST) 7 Feb 2022
झेड सुरक्षा स्विकारण्याची अमित शाहांची ओवैसींना विनंती; म्हणाले...

ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना देऊ केलेली झेड सुरक्षा त्यांनी नाकारली होती. या संदर्भात बोलताना अमित शाह यांनी ओवैसी यांना ती सुरक्षा स्विकारण्याची विनंती केली.

14:42 (IST) 7 Feb 2022
"...त्यांच्या येण्याबद्दल माहिती नव्हतं"; अमित शाहांनी दिली माहिती

ओवैसींचा कार्यक्रम नियोजित नव्हता किंवा त्यांच्या येण्याबद्दल स्थानिक प्रशासनाला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात दोघांना अटक केली असून दोघांकडून प्रत्येकी एक पिस्तूल जप्त केलं आहे, असं अमित शाह यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.

13:40 (IST) 7 Feb 2022
भाषण लिहिणाऱ्याने राष्ट्रपतींवर अन्याय केला आहे - आनंद शर्मा

हा चेष्टेचा विषय नाही. ज्याने कोणी राष्ट्रपतींचं भाषण लिहिलं होतं, त्याने राष्ट्रपतींवर अन्याय केला आहे. हे भाषण लोकांच्या निर्णयाला आव्हान देणारं असून देशासमोरच्या समस्यांना नाकारणारं आहे, असं मत काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मांडलं आहे. ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाच्या सुरूवातीला राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणावर सध्या चर्चा सुरू आहे.

12:51 (IST) 7 Feb 2022
कसा झाला हल्ला? आरोपींनी सांगितला घटनाक्रम आणि कारणसुद्धा...

आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ओवैसींचा पाठलाग करत होते, पण त्यांना हल्ल्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा ओवेसी मेरठमधून दिल्लीला परतत होते तेव्हा त्यांची गाडी टोलनाक्यावर थांबली होती. हीच संधी लक्षात घेता आरोपींनी वाहनावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर ओवैसींची कार पंक्चर झाली आणि त्यानंतर ते दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. सचिन आणि शुभम अशी या हल्लेखोरांची नावं असून ओवैसी यांच्या भाषणांमुळे त्यांच्यात चिड निर्माण झाली होती. तसंच ओवैसींवर हल्ला करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून ते तयारी करत होते. याचसाठी ते ओवैसींच्या प्रत्येक सभेला हजेरी लावत होते. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या सभेतही हे दोघे उपस्थित होते. पोलीस आता या सभेचं सीसीटीव्ही तपासणार आहेत.

11:53 (IST) 7 Feb 2022
हल्ल्यानंतर ओवैसींनी नाकारली होती झेड दर्जाची सुरक्षा; म्हणाले...

"मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेन. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत?, असं ओवैसी म्हणाले होते.

11:22 (IST) 7 Feb 2022
ओवैसींवरील हल्ल्यासंदर्भात काय बोलणार गृहमंत्री अमित शाह?

उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झालाय.या हल्ल्याच्या घटनेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. मात्र या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री भाष्य करणार असल्याने ते नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केल्याचे ओवैसी यांनी सांगितले. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. AIMIM chief Asaduddin Owaisi, Asaduddin Owaisi car attack, Meerut, UP, Uttar Pradesh

हापूर पोलिसांची विविध पथके याप्रकरणी तपास करत असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ओवैसी गुरुवारी मीरत येथे गेले होते. ‘तीन ते चार हल्लेखोर होते आणि त्यांनी आमच्या वाहनाच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या.माझी कार पंक्चर झाली आणि त्यानंतर मी दुसऱ्या वाहनाने रवाना झालो, असे ओवैसी यांनी सांगितले.