तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार असून त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल आणि त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या दाव्यावर आता अमित शाह यांनी थेट उत्तर दिले आहे. तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी आज हैदराबाद येथे पत्रकार परिषद घेतली.

“मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शाहांसाठी मतं मागत आहेत”, केजरीवालांची टीका; म्हणाले, “दोन महिन्यांत..”

Pk mishra with pm modi
पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी प्रधान सचिव पदावर कायम; कोण आहेत पी. के. मिश्रा?
BJP president BJP looking for a woman or Dalit leader JP Nadda
जे. पी. नड्डा यांच्यानंतर दलित वा महिला नेतृत्वाला मिळणार भाजपा अध्यक्षपदाची संधी?
murlidhar mohol
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आज ३० वर्षांनंतर…”
Pratibha Dhanorkar, Chandrapur,
चंद्रपूर : गृहिणी ते आमदार व आता खासदार, प्रतिभा धानोरकर यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास
Third Lok Sabha Election under the leadership of Narendra Modi Mumbai
अबकी बार…आघाडी सरकार! तिसऱ्या कार्यकाळात मोदींची मदार मित्रांवर
article about bjp victory in arunachal pradesh assembly election 2024 zws
पहिली बाजू : ‘जैसे थे’ नसणारा अरुणाचल निकाल!
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
Punjab Panj Pyare PM Modi Sikh religion Mohkam Singh
“गुरु गोविंद सिंगांच्या पाच प्रिय व्यक्तींपैकी एक माझे काका”; पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य का चर्चेत आले आहे?

अमित शाह काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार असल्यामुळे केजरीवाल आणि कंपनीला फार आनंदीत होण्याची गरज नाही. ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे, हे भाजपाच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अमित शाह म्हणाले की, या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामागे आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे की, आम्ही ४०० पार जाणार आहोत. तसेच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच अशाप्रकारचे विधान करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अमित शाह म्हणाले की, या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामागे आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे की, आम्ही ४०० पार जाणार आहोत. तसेच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच अशाप्रकारचे विधान करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२०२९ च्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदीच

अमित शाह पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहतील. तसेच २०२९ च्या निवडणुकीचे नेतृत्वही त्यांच्याकडेच असेल. इंडिया आघाडीसाठी आनंद वाटावा, अशी कोणतीही बातमी नाही. त्यांना अधिक कष्ट घेण्याची गरज आहे. भ्रष्टाचारा संपविण्याची गरज आहे. तसेच लोकांबद्दल अधिक संवेदनशील राहण्याची गरज आहे. याऐवजी विरोधक अपप्रचार करून निवडणूक जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन गेले आहेत, तसेच देशाला ते आणखी पुढे घेऊन जाणार आहेत. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तसेच देशातील जनतेलाही हे पटलेले आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला होता.

मोदीजी तुमच्या निवृत्तीनंतर गँरटी कोण पूर्ण करणार?

“पंतप्रधान मोदी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील. म्हणूनच ते अमित शाह यांच्यासाठी मत मागत आहेत. जर भाजपाची सत्ता आलीच तर पुढच्या दोन महिन्यात योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल. त्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की, मोदींनी दिलेली गॅरंटी कोण पूर्ण करणार? अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार आहेत का?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.