ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी राज्यसभेमध्ये निवेदन केलं. यावेळी त्यांनी ओवैसींवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील माहिती देतानाच ओवैसींनी केंद्राकडून देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा स्वीकारावी अशी विनंती केलीय. आपलं अधिकृत निवेदन संपल्याचं जाहीर केल्यानंतर शाह यांनी अगदीच अनपेक्षितपणे ओवैसी यांना सुरक्षा स्वीकारण्याची विनंती केल्याचं चित्र पहायला मिळालं.

उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी ओवैंसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झाला. या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाष्य केलं.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

हल्ल्याबद्दल काय सांगितलं?
ओवैसींच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झालं नाही तरी गाडीच्या खालच्या बाजूला तीन गोळ्या लागल्यात. या प्रकरणामध्ये तीन जण साक्षीदार असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय, असं अमित शाह यांनी सभागृहाला सांगितलं. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात दोघांना अटक केली असून दोघांकडून प्रत्येकी एक पिस्तूल जप्त केलं आहे, असंही शाह यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.

नियोजित कार्यक्रम नव्हता…
ओवैसी यांचा हापूर जिल्ह्यामधील कार्यक्रम नियोजित नव्हता किंवा ते जिल्ह्यामध्ये येणार आहेत याबद्दल स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. हल्ल्याच्या या घटनेनंतर ते सुरक्षितपणे दिल्लीत पोहचले, असंही शाह यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर ओवैसींना झे दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शाह म्हणाले.

अधिकृत निवेदनानंतर म्हणाले…
अधिकृतपणे या घटनेवर निवेदन दिल्यानंतर शाह यांनी, “माझं निवेदन संपलं आहे. पण ओवैसी यांनी आम्हाला ज्या तोंडी सूचना केल्यात त्याप्रमाणे त्यांनी अजूनही सुरक्षा घेण्यास नकार दिलाय. मी या सभागृहाच्या माध्यमातून ओवैसी यांना विनंती करु इच्छितो की त्यांनी तात्काळ सुरक्षा घ्यावी आणि आम्हा सर्वांच्या चिंतेला पूर्णविराम द्यावा,” असं म्हटलं आणि ते निवेदन संपवून आपल्या आसनावर बसले.

ओवैसी सुरक्षा नाकारताना काय म्हणाले?
या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. केंद्राने दिलेली सुरक्षा नाकारताना लोकसभेत याविषयी ओवैसी यांनी भाष्य केलेलं. “माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा,’ असं ओवैसी म्हणाले होते.

मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत, असे ओवैसी यांनी सांगितले होते.