उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये आता प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या निवडणुकांसाठी सध्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेत आहेत. आज मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच, त्यांच्या सरकारशी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची तुलना करताना अमित शाह यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर देखील निशाणा साधला.

७०० दंगली आणि दंगलखोरांवर वचक

उत्तर प्रदेशमध्ये आधीच्या सरकारच्या काळात तब्बल ७०० दंगली झाल्याचा दावा अमित शाह यांनी केला. तसेच, आत्ताच्या सरकारने दंगलखोलांवर वचक बसवल्याचं देखील ते म्हणाले. “अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ७०० दंगली झाल्या. मात्र, आज योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात दंगलखोरांची डोळे वर करून बघण्याची हिंमत होत नाही”, असं अमित शाह म्हणाले.

PM Narendra Modi On Rahul Gandhi
‘युवराज’ उत्तर प्रदेशातली जागा वाचवू न शकल्याने केरळमध्ये आले; मोदींचा राहुल गांधींवर हल्ला
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
This is the first election after independence which result is already known says CM Adityanath
‘स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच निवडणूक, जिचा निकाल आधीच कळलाय…’
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

निजाम शब्दाचा अर्थ…

दरम्यान, निजाम शब्दावरून शाब्दिक कोटी करत अमित शाह यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. “निजाम (Nizam) शब्दाचा अर्थ चांगले प्रशासन असा होतो. पण अखिलेश यादव यांच्यासाठी N म्हणजे नसिमुद्दीन, I म्हणजे इम्रान मसूद, Z आणि A म्हणजे आझम खान आणि M म्हणजे मुख्तार अन्सारी” आहे. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही अखिलेश यादव यांचा निजाम निवडाल की योगी-मोदी यांच्या सरकारचा विकासाचा निजाम निवडाल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

मायावती-अखिलेश यादव यांना टोला

यावेळी बोलताना अमित शाह यांनी मायावतींना देखील टोला लगावला. “सपा-बसपा विकासाची कामं करू शकत नाहीत. मला बेहेनजींना(मायावती) सांगायचंय की त्यांनी आता तरी जरा बाहेर पडावं, कारण निवडणुका जवळ येत आहेत. नाहीतर त्या नंतर म्हणतील, त्यांनी फारसा प्रचार केला नाही. बुआ-बबुआ काँग्रेस एकत्र लढले, तरी ते निवडणुका जिंकू शकणार नाहीत”, असं देखील अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांचा रोख हा थेट काँग्रेससोबतच मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे.

राहुल गांधी देखील उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात प्रचारसभा घेणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.