गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र पूर्णपणे पालटले आहे. यावर्षीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वर्षभरच सुरू आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होऊनही तापमानात वाढ होत नव्हती. मात्र, मागील दोन आठवडय़ापासून सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे. हवामान निरीक्षण संकेतस्थळ अल डोरादोनुसार, गेल्या २४ तासांतील जगातील सर्वाधिक उष्ण १५ ठिकाणांमध्ये भारताच्या तब्बल दहा शहराचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहराचा समावेश आहे. तसेच भारतासह पाकिस्तानमधीलही उष्ण ठिकाणाचा यामध्ये सहभाग आहे.

उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे.‘वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे. राजस्थानमधील चूरू देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण असल्याची नोंद बुधवारी झाली आहे. चुरू राजस्थानची राजधानी जयपूरपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. मंगळवारी चुरूचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस होतं. चुरूला थार रेगिस्तानचं प्रवेशद्वारही म्हटले जातेय. पाकिस्तानच्या जेकबाबाद आणि भारताच्या चुरूचं तापमान जमिनीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून मंगळवारी नोंद झाली. बीकानेर, गंगानगर आणि पिलानी राजस्थानमधील अन्य तीन शहरं आहेत. ज्यांचा जगातील सर्वाधिक १५ उष्ण ठिकाणामध्ये सहभाग आहे.

Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट
two thief from kalyan ambernath arrested in housbreaking case
महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक
holi color
कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण

जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा आणि हरियाणातील हिसारमध्ये मंगळवारी ४८ डिग्री सेस्लियस तापमानाची नोंद झाली. सर्वात उष्ण शहरांच्या यादीत ४७.६ डिग्री सेल्सअस तापमानासह राजधानी दिल्ली, ४७.४ डिग्री सेल्सिअससह बीकानेर, ४७ डिग्री सेल्सिअसह गंगानगर, ४७ डिग्री सेल्सिअससह झांसी, ४९.९ डिग्री सेल्सियससह पिलानी, ४६.८ डिग्री सेल्सिअससह नागुपूरमधील सोनगांव आणि ४६.५ डिग्री सेल्सिअस तापमानासह अकोला यांचा क्रमांक लागला आहे.

चुरूमध्ये गेल्या दहा वर्षांत मे महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याआधी १९ मे २०१६ रोजी चुरूचे तापमान ५०.२ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. २२ मे २०२० पासून चुरूमध्ये तापमानाची स्थिती पाहिली जात आहे. २२ मे रोजी येथील तापमान ४६.६ डिग्री सेल्सिअर नोंदवलं होतं. त्यानंतर प्रत्येकदिवशी तापमान वाढत राहिले २३ मे रोजी ४६.६ डिग्री सेल्सिअस, २४ मे रोजी ४७.४ डिग्री सेल्सिअस आणि २५ मे रोजी ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमान होतं.

विकासाच्या गर्तेत सर्वच शहरांमध्ये हिरवे जंगल कमी होऊन सिमेंटच्या जंगलात वाढ होत आहे. त्यामुळे तापमानवाढीसाठी हा घटक देखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. एरवी उन्हाळ्यात दिवसा रस्त्यावर वर्दळ कमी असते. मात्र, टाळेबंदीमुळे दीड महिन्याहून अधिक काळ नागरिक घरातच बंदिस्त होते. आता हळूहळू शहरातील व्यवहार सुरू होऊ लागल्याने उन्हाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत. पण वाढलेल्या तापमानामुळे पुन्हा घरातच राहावे लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.