अमरिंदर सिंग हे देशभक्त – भाजप

आम्ही त्यासाठी बांधील असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत.

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांत आपल्यासोबत युती करण्याच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सूचनेचे भाजपने बुधवारी स्वागत केले. सिंग हे देशभक्त असल्याचे सांगून, देशहिताला प्राधान्य देणाऱ्यांशी हातमिळवणी करण्यास आम्ही नेहमीच तयार असल्याचे भाजपने सांगितले.

आपण काँग्रेसचा त्याग करून नवा पक्ष स्थापन करू, अशी घोषणा केलेले अमरिंदर हे घराणेशाहीपासून राष्ट्रवादाकडे वाटचाल करत असल्याचे भाजपचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी दुष्यंत गौतम म्हणाले. आपण लवकरच आपला राजकीय पक्ष स्थापन करणार असून, शेतकऱ्यांचे हित साधून त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आल्यास भाजपसोबत जागावाटप होऊ शकते, अशी आपल्याला आशा असल्याचे अमरिंदर यांनी मंगळवारी म्हटले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या अमरिंदर यांच्या अटीबाबत विचारले असता, सिंग हे शेतकरी आंदोलन संपवण्याबाबत बोललेले नाहीत, याकडे गौतम यांनी लक्ष वेधले. ‘ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत बोलले आहेत. आम्ही त्यासाठी बांधील असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. वेळ येईल तेव्हा आम्ही दोघेही एकत्र बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू’, असे गौतम यांनी पीटीआयला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amrinder singh is a patriot bjp

Next Story
‘सही’ रे सई
ताज्या बातम्या