खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग याचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यात अमृतपाल भारत आणि विदेशातील शिख समुदायाला अन्यायाच्या विरोधात लढण्याचं आवाहन करत आहे. हा व्हिडीओ एक ते दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, हा व्हिडीओ ज्या युट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झाला, त्यावर सरकारने बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत अमृतपाल सिंग म्हणतो की, “शिख समुदायाने एक मोठ्या कारणासाठी एकत्र येणे गरजेचं आहे. सरकारने लोकांवर, महिला आणि लहान मुलांवर अत्याचार केले आहेत. अकाल तख्तचे जथेदार यांच्या २४ तासांच्या आवाहनाचेही सरकारने पालन केलं नाही.”

हेही वाचा : पंजाबात अमृतपाल सिंगला घेरलं? सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

व्हिडीओत अमृतपालने त्याच्या एका सहकाऱ्याचा उल्लेख केला आहे. “बाजेके हा एक सामान्य शिख आहे. त्याच्यावरही एनएसए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अन्य सहकाऱ्यांना आसामला पाठवण्यात आलं आहे,” असं अमृतपालने सांगितलं आहे.

हेही वाचा : राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…

“सरकारला मला अटक करायची असती, तर आत्मसमर्पण केलं असते. पण, सरकारने अवलंबलेला मार्ग योग्य नाही. पोलीस बळाचा वापर करून, मला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या केसांनाही कोणी हात धक्का लावू शकत नाही. या खडतर प्रवासात वाहे गुरूंनी मला साथ दिली,” असं अमृतपाल सिंग म्हणाला आहे.

More Stories onपंजाबPunjab
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritpal singh releases video message appeals to sikhs to unite ssa
First published on: 29-03-2023 at 20:33 IST