नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख दूध पुरवठादार कंपन्या, अमूल आणि मदर डेअरीने उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, आपल्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर गुरुवार, १४ मेपासून लागू होतील.
‘अमूल’ ब्रँडअंतर्गत दुधाची विक्री करणार्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी देशभरातील दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. पशुखाद्य, दुधाचे पॅकेजिंग आणि इंधनाच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मदर डेअरीनेही आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे.
