टर्की आणि सीरियात झालेल्या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत २६ हजारांहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. टर्कीमधून भूकंपाचे जे छायाचित्र येत आहेत, ते अतिशय भीतीदायक असे आहेत. यातच भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टर्कीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी भूकंप आल्यानंतर भारतीय नागरिक विजय कुमार (वय ३६) बेपत्ता होते. आज अखेर त्यांचा मृतदेह सापडल्याची घोषणा टर्कीमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. टर्कीच्या मालट्या येथील एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली विजय कुमार यांचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार मुळचे उत्तराखंडचे असलेले विजय कुमार टर्कीमध्ये बिझनेस ट्रीपसाठी गेले होते.

टर्कीमधील भारतीय दूतावासाने विजय कुमार यांच्या कुटुंबाप्रती संवदेना व्यक्त केली आहे. तसेच त्यांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी नातेवाईकांकडे पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असेही सांगितले.

Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

टर्कीमध्ये भूकंपामुळे इमारती जमीनदोस्त, लाखों इमारतींना तडे

टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठा प्रलय माजला. दोन्ही देशांमध्ये मिळून २६ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. दोन्ही देशामध्ये बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाने मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविल्यामुळे भूकंपाचा विनाश काही थांबताना दिसत नाही. बचावकार्य करणाऱ्या पथकाने सांगितले की अजूनही शेकडो परिवार ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. टर्कीमधील १० राज्यांमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक होती, तिथे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळते. याठिकाणी जवळपास १० हजार इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर एक लाख इमारतींना तडे जाऊन इमारतींचे नुकसान झाले आहे.

सीरियामध्ये ५३ लाख लोक बेघर होण्याची भीती

एसएमएचच्या बातमीनुसार, सीरियामध्ये कडक थंडी आणि भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. अनेकांना अन्न मिळत नाहीये. टर्की आणि सीरिया सरकारला लोकांच्या आरोपांना तोंड देत बचाव कार्य करावे लागत आहे. बचाव कार्य करण्यासाठी संपूर्ण जगाने पुढाकार घेतला असून अनेक देशातील बचाव पथके दोन्ही देशांमध्ये लोकांचे जीव वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान संयुक्त राष्ट्र संघाने एक भीती वर्तविली आहे. टर्की आणि सीरियामध्ये जवळपास आठ लाख लोकांना अन्नपदार्थाची आवश्यकता आहे. तर एकट्या सीरियामध्ये ५३ लाख लोक बेघर होण्याची भीती वर्तविली जात आहे.