scorecardresearch

Premium

आनंद महिंद्रांनी शेयर केलेल्या भन्नाट गाडीचा व्हिडीओ पाहिलात का?, म्हणाले, ‘माझ्या अंदाजाप्रमाणे…’

काही दिवसांपूर्वीच सांगलीतील दत्तात्रय लोहार यांच्या एका भन्नाट चार चाकीचा व्हिडीओ शेयर केला होता.

Anand Mahindra shared video of dining car is going viral
संग्रहित

महिंद्रा अॅंण्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर जुगाड गाड्यांचा किंवा एखादा हटके व्हिडीओ शेयर करत असतात. ते आपल्या फॉलोअर्सला नेहमीच प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा चारचाकीचा हटके व्हिडीओ शेयर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर शेयर केलेल्या व्हिडीओत एका डायनिंग टेबलला चाकं लावली आहेत. सोबतच त्याला खुर्च्याही जोडण्यात आल्या आहेत. तसेच त्याला हॅंडलही आहे. हा गाडीसारखा दिवसणारा डायनिंग टेबल इंधन भरण्यासाठी गॅस स्टेशनवर जातानाही दिसतो आहे. हा गाडीसारखा दिवसणारा डायनिंग टेबल सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होतो आहे.

wedding dresses
लग्नांच्या पोशाखात ‘पेस्टल’ रंगच ‘हिट’!
Uddhav Thackeray eknath shinde 1
“ये डर अच्छा हैं”, एकनाथ शिंदेंचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले…
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…
Stray Dogs issue
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे थेट सुप्रीम कोर्टात पडसाद; जखमी वकिलावरून सुरू झाली चर्चा

आनंद महिंद्रा नेहमीच असे हटके व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सांगलीतील दत्तात्रय लोहार यांच्या एका भन्नाट चार चाकीचा व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओदेखील अनेकांना प्रचंड आवडा होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांना बोलेरे गाडीही भेट दिली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra shared video of dining car is going viral spb

First published on: 05-07-2022 at 15:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×