Andhra Pradesh Bus Accident in Markapuram causes 13 deaths as private bus catches fire after truck collision : आंध्र प्रदेशातील मर्कापुरम (Markapuram) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका खासगी बसला लागलेल्या आगीत किमान १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

तेलंगणातील जगतिअल (Jagtial) येथून नेल्लोर जिल्ह्यातील विंजामुरूकडे जाणाऱ्या हरीकृष्ण ट्रॅव्हल्सची एका ट्रकला धडक बसली. त्यानंतर बसने पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये किमान ४० प्रवासी होते.

राज्याचे वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री सत्य कुमार यादव यांनी या घटनेनंतर तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच १० लोकांचा मृ्त्यू झाल्याची पुष्टी देखील केली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही यादव यांनी सांगितले.

बस पूर्णपणे जळून खाक झाली असून आणि किमान ३० प्रवासी थोडक्यात बचावल्याची माहिती दिली.

तसेच मंत्र्यांनी जखमींना तातडीने प्रगत वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, घटनास्थळी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रवाना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.