रेड्डी आंध्र प्रदेशचे प्रभारी मुख्यमंत्री

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कारभार पाहण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे.

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कारभार पाहण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे.स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीच्या प्रश्नावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी दिलेला राजीनामा राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना कारभार पाहण्याचे आदेश दिले आहेत, असे राजभवनातून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केल्याने तेथे राष्ट्रपती राजवट येईल, असे संकेत दिल्लीतून देण्यात आले होते. राज्यात अंतरिम सरकार स्थापन करण्यास आंध्र प्रदेश काँग्रेसमधील एक गट अनुकूल होता.
तथापि, किरणकुमार रेड्डी यांच्या वारसदाराचा शोध घेण्याचे काम काँग्रेससाठी कठीण होते, कारण काँग्रेस विधिमंडळ पक्षात प्रादेशिक वाद उफाळून आला होता. विद्यमान विधानसभेची मुदत २ जून २०१४ रोजी संपुष्टात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Andhra pradesh governor accepts kiran kumar reddys resignation