भयानक, मुलींच्या मृतदेहाजवळ आईचं गायन आणि नाच सुरु होता, हादरवून सोडणारी घटना

पोलीस रविवारी या जोडप्याच्या घरी पोहोचले, तेव्हा आई-वडिल दोघेही….

तांत्रिकाच्या नादी लागून आई-वडिलांनीच पोटच्या दोन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. मादानापाल्ली पोलिसांनी या प्रकरणी आई-वडिलांना अटक केली आहे. पोलीस रविवारी या जोडप्याच्या घरी पोहोचले, तेव्हा आई-वडिल दोघेही समाधीवस्थेत होते. वडिल डॉक्टर पुरुषोत्तम नायडू त्या अवस्थेतून बाहेर आले तर आई पद्मजा विचित्र वागत होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मृत मुलींची आई गात होती, नाचत होती, ओरडत होती. करोना व्हायरसची उत्पत्ती चीनमध्ये नाही, तर देवाने केली आहे. कलयुगातील वाईट गोष्टी संपवण्यासाठी करोना व्हायरस आलाय असं पद्मजा ओरडत होती. कोविड-१९ च्या चाचणीसाठी पोलीस पद्मजाला रुग्णालयात घेऊन गेले, तेव्हा ती चाचणीसाठी नमुना देत नव्हती. मी माणसामधला करोना व्हायरसचा एक प्रकार असून चाचणीची गरज नाही, असे ती ओरडून सांगत होती.

आणखी वाचा- मूलबाळ होत नसल्याने टोमणे मारणाऱ्या सासूची सूनेनं केली हत्या; मृतदेहाचे डोळे फोडले, बोटं कापली

पोलिसांनी आरोपी क्रमांक एक म्हणून पुरुषोत्तम नायडूची तर आरोपी क्रमांक दोन म्हणून पद्मजाच्या नावाची नोंद केलीय. या दोघांनी रविवारी आपल्या दोन पोटच्या मुलींची हत्या केली. पद्मजाची वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांना खूपच त्रास झाला. ती विचित्र वागत होती. मी शिवाचा अवतार आहे, असे तिचे म्हणणे होते. मादानापाल्लीचे डीएसपी रवी मनोहरचारी यांनी ही माहिती दिली. दोन्ही आरोपींना स्थानिक न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिरुपतीच्या सरकारी रुग्णालयातील मानसोपचार वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Andhra pradesh horror mother was singing and dancing near daughters body dmp