सलाम! महिला पोलीस उपनिरीक्षकाने खांद्यावरुन वाहून नेला बेवारस व्यक्तीचा मृतदेह

गावकरी मदतीसाठी पुढे आले नाहीत, त्यावेळी तिने….

कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही, हे पाहून अखेर एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आपल्या खांद्यावरुन एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेला. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील आदिवि कोत्तुतू गावात सोमवारी ही घटना घडली. आदिवि कोत्तुतू गावातील शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती, कासीबुग्गा पोलिसांना मिळाली.

कासीबुग्गाच्या पोलीस उपनिरीक्षक सिरिशा कॉन्स्टेबलसह तिथे पोहोचल्या. “एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शेतामध्ये पडलेला होता. त्याचे वय ८० होते. मृत व्यक्ती भीख मागून गुजराण करत असल्याचे गावकऱ्यांकडून समजले. त्या व्यक्तीचा मृतदेह शेतातून वाहनापर्यंत नेणे कठिण होते. कारण तिथे रस्ता नव्हता. वाट शेतातून जाणारी होती. आम्ही गावकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. पण कोणीही पुढे आले नाही” असे सिरिशाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

“हा संशयास्पद मृत्यू नव्हता, कारण शरीरावर कोणताही जखमा नव्हत्या. उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचे दिसत होते” असे सिरिशाने सांगितले. मदतीसाठी गावकरी पुढे येत नाही, हे पाहून अखेर सिरिशाने पुढाकार घेतला. तिने ललिता ट्रस्टच्या सदस्यांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह उचलून तात्पुरत्या स्ट्रेचरवर ठेवला. ती स्ट्रेचर खांद्यावरुन उचलून शेतातून वाट काढली. पोलीस वाहनापर्यंत पोहोचायला त्यांना २५ मिनिटे लागली. हे फोटो समोर आल्यानंतर सिरिशाचे आता कौतुक होतेय. सिरिशा १२ वर्षाच्या मुलाची आई आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Andhra pradesh woman sub inspector carries body of homeless man dmp

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका