वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हृषीकेश येथील कालव्यातून १९ वर्षीय अंकिता भंडारीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर काही तासांनी स्थानिक रहिवाशांनी अंकिता ज्या ‘रिसॉर्ट’मध्ये कामाला होती, त्या ‘रिसॉर्ट’ला आग लावली. अंकिताच्या खुनाचा आरोप असलेल्या पुलकित आर्य याच्या मालकीचे हे ‘रिसॉर्ट’ आहे. पुलकित हा उत्तराखंडचे भाजपचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे. खुनाची घटना उघड झाल्यानंतर भाजपने विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पंजाबमध्ये विधानसभा अधिवेशनावरून राज्यपाल – मुख्यमंत्री वाद तीव्र

या घटनेनंतर संतापाची लाट पसरताच मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आश्वासन दिले, की या घटनेत दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. तपासासाठी उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण्यात आले आहे. धामी यांनी सांगितले, की ही एक अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे. हा गंभीर गुन्हा आहे. संबंधितांवर कारवाई होईल. मुख्य आरोपी पुलकित आर्यचे वडील आणि भावाची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. हे ‘रिसॉर्ट’ पाडण्याचे काम सुरू आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून त्याच्या काही खोल्याही बंदिस्त (सील) केल्या आहेत.

हेही वाचा >>> पाकिस्तानची भाषा शांततेची, पण मदत दहशतवाद्यांना; शाहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील वक्तव्याला भारताचे प्रत्युत्तर

पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले, की ‘रिसॉर्ट’मध्ये आलेल्या ग्राहकांना ‘विशेष सेवा’ पुरवावी, असा पुलकित आर्यचा अंकितावर दबाव होता असा आरोप आहे. शुक्रवारी पुलकितसह या ‘रिसॉर्ट’चे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहायक व्यवस्थापक अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा >>> शंकराचार्यपदी अविमुक्तेश्वरानंदांची निवड संन्यासी आखाडय़ांना अमान्य

भाजप आमदाराच्या मोटारीवरही हल्ला

या ‘रिसॉर्ट’च्या परिसरात हिंसक निदर्शने सुरू झाली आणि स्थानिक रहिवाशांनी काचा फोडल्या. काहींनी ‘रिसॉर्ट’च्या आवारातील लोणच्याच्या कारखान्याला आग लावली. भाजपच्या यमकेश्वरच्या आमदार रेणू बिश्त यांच्या मोटारीवरही संतप्त जमावाने हृषीकेशजवळील चीला कालव्याजवळ हल्ला केला. येथे बेपत्ता अंकिताचा मृतदेह सहा दिवसांनंतर सापडला होता. संतप्त जमावाने बिश्त यांच्या मोटारीची तोडफोड करण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांनी बचाव करून त्यांची सुरक्षित सुटका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry reaction killing young woman uttarakhand resort fire ysh
First published on: 25-09-2022 at 00:24 IST