उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी या तरुणीच्या खुनानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, अकिंताच्या आईनेही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – भीषण दुर्घटना : तलावात ट्रॅक्टर उलटल्याने दहा जणांचा मृत्यू ; ३७ जण जखमी

माझ्या मुलीचा जीव घेणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जर सरकारला त्यांना फाशीची शिक्षा देत नसेल तर आरोपींना आमच्या घरासमोर जिवंत जाळायला हवं, अशी प्रतिक्रिया अंकिताच्या आईने दिली आहे. तसेच अंकिताच्या अंत्यसंस्काराची माहितीही आम्हाला दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा

काय आहे प्रकरण?

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी या तरुणीच्या मृतदेह उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील कालव्यात आढळून आला होता. रिसॉर्टमधील अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुलकित आर्या आणि त्याचे साथीदार दबाव आणत असल्याचे अंकिताने तिच्या मित्राला सांगितले होते. १८ सप्टेंबरला पुलकित आर्याच्या रिसॉर्टमधून अंकिता भंडारी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता रात्री आठच्या सुमारास पुलकित, रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्तासोबत हृषीकेशला गेली होती. या शहरातून परतत असताना आरोपी चिला रोड परिसरातील एका कालव्याजवळ दारू पिण्यासाठी थांबले होते. या दरम्यान, रिसॉर्टमध्ये गैरकृत्य करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करत अंकिताचा आरोपींसोबत जोरदार वाद झाला. ही बाब सार्वजनिक करण्याची धमकी देताच रागाच्या भरात आरोपींनी अंकिताला कालव्यात ढकलून दिले.