ankita bhandari murder case pulkit arya resort was den of prostitution and drug abbuse says ex employess | Loksatta

Ankita Bhandari Murder: पुलकित आर्याचे रिसॉर्ट वेश्याव्यवसायाचा अड्डा, माजी कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडे खुलासा

“पुलकित रिसॉर्टवर काही खास पाहुण्यांना आणायचा. या पाहुण्यांसाठी ड्रग्जची व्यवस्था केली जायची” असे रिसॉर्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे

Ankita Bhandari Murder: पुलकित आर्याचे रिसॉर्ट वेश्याव्यवसायाचा अड्डा, माजी कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडे खुलासा

उत्तराखंडमधील अंकिता भंडारी खून प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्याच्या ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये वेश्याव्यवसाय चालायचा, अशी माहिती या रिसॉर्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. या रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

Ankita Bhandari Murder : “…तर आरोपींना आमच्या घरासमोर जिवंत जाळा”, अकिंताच्या आईची सरकारकडे मागणी

अंकिता भंडारी खून प्रकरणात उत्तराखंडमधील भाजपाचे माजी नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकीत यांच्यासह दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे. “पुलकितकडून रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जायचा. ही नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात चोरीचे खोटे आरोप केले जायचे”, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. यानुसार पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Ankita Bhandari Murder: “मी गरीब असले तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही” मृत्यूपूर्वीचे अंकिताचे संभाषण आले समोर

“पुलकित रिसॉर्टवर काही खास पाहुण्यांना आणायचा. या पाहुण्यांसाठी रिसॉर्टमध्ये अनोळखी महिला यायच्या. या लोकांकडून रिसॉर्टमध्ये गैरकृत्य केले जायचे. या पाहुण्यांसाठी या ठिकाणी ड्रग्जची व्यवस्था केली जायची” असे पोलीस तपासात रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याने सांगितले आहे. दरम्यान, अंकिता भंडारीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. न्यायालयासमोर हा अहवाल सादर केल्यानंतरच याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाईल, असे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले आहे.

Ankita Bhandari Murder Case: फेसबूक फ्रेंडमुळे उलगडलं हत्येचं गूढ, धक्कादायक कारण आलं समोर

अंकिता भंडारीच्या खुनाविरोधात उत्तराखंडमध्ये स्थानिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुलिकत आर्याचे रिसॉर्ट संतप्त जमावाने पेटवून दिले होते. याआधी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर या रिसॉर्टचा काही भाग पाडण्यात आला होता. अंकिताच्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
PM Shinzo Abe’s State funeral: शिंजो आबेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

संबंधित बातम्या

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी मोबाईलवर बंदी; मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक
मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी