दोन पोलिसांचा मृत्यू; काही जण ओलीस

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात ‘पाकिस्तानी तालिबान’च्या दहशतवाद्यांनी सोमवारी दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा मिळवला. त्यांनी येथे काही जणांना ओलीस ठेवले. या वेळी झालेल्या चकमकीत दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

दहशतवादविरोधी पथकांनी अटक केलेल्या काही दहशतवाद्यांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत होती. त्याच वेळी यापैकी एका दहशतवाद्याने रविवारी पोलिसांकडून ‘एके-४७’ रायफल हिसकावून घेतली व गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्यांनी दहशतवादविरोधी केंद्राच्या संकुलावर ताबा मिळवून कैदेतील इतर दहशतवाद्यांची सुटका केली. त्यांनी अनेक पोलिसांनाही ओलीस ठेवले. या केंद्रात लष्करी कारवाई  अनेक तास सुरू होती. 

या प्रांताचे माजी मुख्यमंत्री अक्रम खान दुर्रानी व मंत्री मलिक शाह मोहम्मद दहशतवाद्यांशी चर्चेसाठी बन्नू येथे पोहोचले आहेत. दुर्रानी व मोहम्मद दोघेही बन्नूचे आहेत. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी त्यांना सुरक्षितरीत्या अफगाणिस्तानात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी सुरक्षा दलांकडे केली.