scorecardresearch

युरोप, रशियात युद्धविरोधी निदर्शने

जर्मन ट्रेड युनियनने युद्धाविरोधात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बर्लिनच्या रस्तावर हजारो लोक निदर्शनांत सहभागी झाले

बर्लिन : रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईच्या निषेधार्थ युरोपमधील अनेक शहरांत रविवारी मोर्चे काढण्यात आले. युक्रेनवरील हल्ल्याला विरोध करण्यासाठी रशियामध्ये निदर्शने झाली. रशियात सरकारने निदर्शकांना अडवण्याचा प्रयत्न करूनही लोक रस्त्यावर उतरले.  

जर्मन ट्रेड युनियनने युद्धाविरोधात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बर्लिनच्या रस्तावर हजारो लोक निदर्शनांत सहभागी झाले. तेथील अलेक्झान्डर प्लाट्झ या चौकातून मोर्चास आरंभ झाला. हा मोर्चा ब्रँडेनबर्ग गेटपर्यंत गेला. अनेक निदर्शकांनी युक्रेनचा राष्ट्रध्वज हाती धरला होता. युद्ध थांबवा, शांतता आणि युक्रेनच्या लोकांना पािठबा दर्शविणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. युक्रेनवर रशियाकडून दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे बॉम्बहल्ले होत असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे. हा मोर्चा रशियाच्या दूतावासापुढून गेला. यात अनेक रशियन नागरिकही सहभागी झाले होते. आमच्या मायदेशाच्या कृत्यांची आम्हाला लाज वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. जर्मनीत शिक्षण घेत असलेली रशियन विद्यार्थिनी अलेक्सॉन्ड्रा बेलोझेरोव्हा म्हणाली की, आमचा युद्धाला विरोध आहे. त्यासाठी  मोर्चात आलो आहोत.  आम्ही इतके तरी करू शकतो.

वर्साव, लंडन, जर्मनीतील फ्रँकफर्ट, हॅम्बर्ग आणि स्टुटगार्ट शहरांतही निदर्शने झाली.

रशियात सरकारची दडपशाही

रशियात युद्धाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांच्या विरोधाचा मोठा सामना करावा लागत आहे, असे ओव्हीडी-इन्फो या उजव्या गटाने म्हटले आहे. तेथील ३६ शहरांत दुपापर्यंत ६६८ निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. क्रमलिननजीकच्या चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. गेल्या आठवडय़ातील निदर्शनांदरम्यान पाच हजारांहून अधिक लोकांना पोलिसांना ताब्यात घेतले होते. त्या तुलनेत या वेळी निदर्शकांची संख्या अत्यंत कमी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anti war protests across europe small rallies in russia zws