scorecardresearch

“जा अपर्णा जा…”; भाजपा प्रवेशानंतर मुलायमसिंह यादवांच्या सुनेने घेतले त्यांचे आशिर्वाद; फोटोवर येतायत भन्नाट प्रतिक्रिया

अपर्णा यादव यांचा हा फोटो व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी लखनौमध्ये येऊन आपले सासरे आणि समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलायमसिंह यादवांच्या पाया पडत त्यांचे आशिर्वादही घेतले. यावेळचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी मुलायमसिंह यादवांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यासोबतच त्यांनी लखनौ विमानतळावरचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी लिहिलं आहे की, मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि माझा सन्मान आणि उत्साह वाढवला.

यावरून काही युजर्सनी चेष्टा केली आहे. काही जणांनी म्हटलं आहे की, मुलायमसिंह यादवांनी तुम्हाला आशिर्वाद दिला असेल पण विजयी भव असं नक्कीच म्हटले नसतील. तर एका युजरने कमेंट केली आहे की मुलायमसिंह यादव तुमच्यावर खूश नाहीत. एका ट्विटर युजरने म्हटलं आहे, “मुलायमसिंह म्हणाले असतील जा अपर्णा जा जिले अपनी जिंदगी”. तर आणखी अमित राजपूत या युजरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हे आहेत भाजपाचे संस्कार. राजकीय वाद कितीही असतील मात्र कौटुंबिक जिव्हाळा आणि बांधिलकी कायम आहे.

तर राकेश यादव नावाच्या युजरने याला राजकीय स्टंट संबोधलं आहे. त्या युजरचं म्हणणं आहे की, हा एक राजकीय स्टंट आहे. भाजपावाल्यांनी काल त्यांच्या कार्यालयातच हे शिकवून आज पाठवलं असेल. सूरज यादव नावाचा युजर म्हणतो, मुलायमसिंह म्हणाले असतील बाबूल की दुआएँ लेती जा, जा तुझको बीजेपी में प्यार मिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aparna yadav reached lucknow and met akhilesh yadav father mulayam singh yadav photo share on social media vsk

ताज्या बातम्या