संगणक निर्मितीच्या क्षेत्रात अग्रणी असलेली ‘अ‍ॅपल’ कंपनी सध्या एका गुप्त प्रयोगशाळेत विजेवर चालणाऱ्या कारच्या निर्मितीचे काम सुरू करत असल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या लोकांच्या हवाल्याने दिले आहे.
या प्रकल्पात मिनी व्हॅनसारखे दिसणारे एक वाहन डिझाईन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यास अनेक वर्षे लागणार आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील गुगल, उबेर व टेस्ला मोटर्ससारख्या अनेक कंपन्यांसाठी आस्थेचा विषय झालेल्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अ‍ॅपलच्या महत्त्वाकांक्षा वाढत असल्याचे संकेत या वृत्तातून मिळाले आहेत.