IIT Delhi Summer Research Fellowship Programme 2026: भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली येथे ‘उन्हाळी संशोधन फेलोशिप कार्यक्रम २०२६’ साठी अर्जप्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. आठ आठवड्यांच्या या फेलोशिपद्वारे एम. टेक. (M.Tech) आणि एम.ई. ( M.E.) विद्यार्थ्यांना आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी मिळेल.
कधीपर्यंत अर्ज करता येणार?
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १६ मार्च २०२६ रोजी सुरू झाली असून, ती ३ एप्रिल २०२६ रोजी बंद होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी मे महिन्यात जाहीर केली जाईल, आणि कार्यक्रम १३ मे ते १३ जुलै २०२६ दरम्यान आयोजित केला जाईल. ही शिष्यवृत्तीची संधी उमेदवारांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
‘उन्हाळी संशोधन फेलोशिप कार्यक्रमा’साठी पात्रता
- पदवीपूर्व विद्यार्थी (IIT दिल्ली वगळता), ज्यांनी अभियांत्रिकी पदवीच्या अभ्यासाची किमान दोन वर्षे पूर्ण केली आहेत आणि जे आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या दहा क्रमांकांमध्ये आहेत.
- कोणताही M.Tech./M.E. विद्यार्थी (IIT दिल्ली वगळता), ज्याने आपल्या अभ्यासक्रमाचे पहिले सत्र पहिल्या दहा क्रमांकांमध्ये राहून पूर्ण केले आहे आणि पहिल्या सत्राच्या शेवटी किमान सत्तर टक्के गुण किंवा ७.०० सीजीपीए प्राप्त केले आहे.
फेलोशिपमध्ये काय मिळणार?
- देशांतर्गत प्रवासाचा खर्च: फक्त रेल्वेच्या स्लीपर क्लासचा, ज्यामध्ये IIT दिल्लीला येण्या-जाण्याचा खर्च समाविष्ट असेल.
- आयआयटी दिल्ली येथे वास्तव्य: संस्थेच्या वसतिगृहांमधील निवास आणि भोजन.
- फेलोशिप रक्कम: प्रति आठवडा दोन हजार रुपये
- नोंदणी: निवड झालेला विद्यार्थी IIT दिल्ली येथे ‘भेट देणारा विद्यार्थी’ म्हणून नोंदणी करेल; त्याला/तिला संस्थेचे नोंदणी शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
- विमा: निवड झालेल्या विद्यार्थ्याला वास्तव्याच्या कालावधीत संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतःचा विमा घेणे आवश्यक आहे (अपघात आणि अपघाती मृत्यूचा समावेश असणे आवश्यक).
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन या लिंकवर उपलब्ध आहे: https://oldacademics.iitd.ac.in/srf/main.php
अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे:
१. छायाचित्र (JPG, २००×२३० पिक्सेल्स, कमाल आकार १०० KB)
२. एकत्रित गुणपत्रिका (Consolidated Grade Card, PDF)
३. रँक प्रमाणपत्र (PDF)
४. मूळ संस्थेकडून मिळालेले ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate, PDF). ज्यात आयआयटी दिल्ली येथे फेलोशिप अंतर्गत पूर्णवेळ संशोधन कार्याची सुरुवात व समाप्तीची तारीख नमूद असावी.
