पीटीआय, नवी दिल्ली

मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करणारे आठ अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. सहा राज्यांतील आठ लोकसभा मतदारसंघांतून हे अर्ज आले असून महाराष्ट्रातून अहमदनगर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागणारे भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही अर्ज केला आहे.लोकसभा निवडणुकीत डॉ. विखेंचा २८,९२९ मतांनी पराभव झाला. मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करावी, अशी मागणी विखेंनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Application from 8 constituencies to election commission amy