“अमेरिकेपेक्षा मध्य प्रदेशमधले रस्ते चांगले? मग हा बघा भोपाळमधला रस्ता”

काँग्रेस नेते अरुण सुभाष यादव यांनी मध्य प्रदेशातील रस्त्यांचे फोटो शेअर करत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे

Are the roads in Madhya Pradesh better than the US? Then look at the road in Bhopal

काँग्रेस नेते अरुण सुभाष यादव यांनी मध्य प्रदेशातील रस्त्यांचे फोटो शेअर करत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले असल्याचे म्हटले होते. याचाचं संदर्भ घेत अरुण सुभाष यादव यांनी रस्त्याची चाळण झालेला भोपाळमधील भारत टॉकीज समोरचा फोटो ट्वीट करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यांची तुलना थेट वॉशिंग्टनच्या रस्त्यांशी केली होती. खरंतर तुलना नाहीच तर त्यांनी थेट मध्य प्रदेशातील रस्ते वॉशिंग्टनच्या रस्त्यांपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याच भूमीत त्यांनी हे विधान करण्याचं धाडस केलं होतं. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांच्या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी हाणामारी झाली होती.

काय म्हणाले होते शिवराजसिंह चौहान?

वॉशिंग्टन डीसी येथील रसेल सिनेट हॉलमध्ये भारतीय दूतावासाच्या सहकार्याने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय फोरम’चा शुभारंभ करण्यात आले होते. त्या वेळी बोलताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होती की, मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यावर रस्त्याने कार्यक्रमस्थळी येताना मला असे जाणवले की मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले आहेत. आणि केवळ गंमत म्हणून नाही तर हे वास्तव असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Are the roads in madhya pradesh better than the us then look at the road in bhopal srk