देशाच्या नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी विद्यमान केंद्र सरकारला देण्याबाबत निवडणूक आयोगात एकमत झाल्याचे वृत्त आहे. याबाबत एक दोन दिवसांत अधिकृत घोषणा होणार असून तसे झाल्यास यूपीए-२च्या कार्यकाळातच नवीन लष्करप्रमुखाची घोषणा होऊ शकते.
विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग हे ३१ जुलै रोजी निवृत्त होत असल्याने केंद्र सरकारने नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र, भाजपने आक्षेप घेतल्याने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या आदेशानुसार संरक्षण दलातील नियुक्त्या, बढत्या आचारसंहितेच्या कार्यकक्षेत येत नाहीत. याच मुद्याच्या आधारे आयोगाने केंद्र सरकारला परवानगी देण्याचे ठरविले आहे.