गौरीकुंडमधील पर्यंटकांना तेहरीच्या मार्गाने बाहेर काढण्यास सुरुवात

उत्तराखंडमधील पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केदारनाथाच्या खालील भागात अडकलेल्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.

उत्तराखंडमधील पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केदारनाथाच्या खालील भागात अडकलेल्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने तेहरीकडे जाणारा मार्ग खुला केल्यामुळे या मार्गाने गौरीकुंड आणि आसपासच्या भागात अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यास सुरुवात झालीये.
सद्यस्थितीत हजारो भाविक गौरीकुंडमध्ये अडकलेले आहेत. गौरीकुंडला जोडणारे रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. गुरुवारी रात्री लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या साह्याने गौरीकुंडला पोहोचले. गौरीकुंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना कशा पद्धतीने बाहेर काढता येईल, याचे नियोजन सैन्यदल करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेहरीकडे जाणाऱया रस्त्याने पर्यटकांना गौरीकुंडमधून बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली.
केदारनाथमधील पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलेले असले, तरी उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अद्याप ५० हजारांहून अधिक भाविक अडकलेले आहेत. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Army opens alternate route via tehri rescue in full swing

ताज्या बातम्या