मुंबई – भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेसचे जवळपास आठ डबे रूळावरून घसरले आहेत. सकाळी सातच्या सुमारास ही घटना कटक येथील निरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. यामध्ये २० प्रवासी जखमी झाले आहेत, तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#UPDATE Chief Public Relation Officer (CPRO), East Coast Railway: 20 people injured after eight coaches of Lokmanya Tilak Express derail near Salagaon. No casualty reported till now. #Odisha https://t.co/JqaXdhzHTN
— ANI (@ANI) January 16, 2020
दाट धुक्यांमुळे ही रेल्वे अन्य एका मालगाडीला धडकली असल्याने हा दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे.
