पीटीआय, चंडीगड : Amritpal Arrest soon ‘खलिस्तान समर्थक, फुटीरतावादी अमृतपाल सिंगला लवकरच पकडले जाईल. या संदर्भात अनेक तपास यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे,’ असा दावा पंजाब सरकारने मंगळवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात केला. पंजाबच्या पोलिसांनी १८ मार्च रोजी पंजाबमध्ये अमृतपाल आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली होती.  तेव्हापासून अमृतपाल बेपत्ता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 सरकारने त्याला फरार घोषित केले आहे. समाजमाध्यमांतील छायाचित्रे व चित्रफितींत तो अनेक वेळा वेगवेगळय़ा वेषात दिसला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वेशांतर करत आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना पकडले आहे. मंगळवारी न्यायमूर्ती एन. एस. शेखावत यांच्या न्यायालयात अधिवक्ता इमान सिंग खारा यांनी दाखल केलेल्या कैदेतील अमृतपालला न्यायालयासमोर हजर करण्याच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. या याचिकेत अमृतपाल सिंगची कथित पोलीस कोठडीतून सुटका करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest amritpal soon punjab government claims in high court ysh
First published on: 29-03-2023 at 00:02 IST