scorecardresearch

इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (संग्रहित छायाचित्र)

वृत्तसंस्था, इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. जाहीर सभेत आक्षेपार्ह विधाने केल्याचा खान यांच्यावर आरोप आहे.

२० ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत खान यांनी केलेल्या भाषणाविरोधात तक्रार दाखल झाली होती. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांच्यासह एका महिला अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून धमकावल्याचा आरोप आहे. याबाबत खान यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. ‘आपण २० तारखेच्या सभेत सीमारेषा ओलांडल्याची जाणीव आहे. यापुढे असे वर्तन होणार नाही,’ असे खान यांनी लिहून दिले. मात्र त्यानंतर थोडय़ाच वेळात सदर न्यायालयाने खान यांच्याविरोधात वॉरंट बजावले. दरम्यान, हे वॉरंट बजावण्यात आल्यानंतर खान यांच्या घराबाहेर पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाल्याचे वृत्त काही पाकिस्तानी माध्यमांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या