वृत्तसंस्था, पॅरिस

फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे सेवेच्या रुळांवर तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, पॅरिसकडे जाणाऱ्या उत्तर, पूर्व आणि पश्चिमेकडील मुख्य मार्ग टप्प्याटप्प्याने लक्ष्य केले गेले. त्यामुळे ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी पॅरिसचा प्रवास ठप्प झाला. यामुळे लाखो प्रवासी अडकून पडले आहेत.रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले असून या घटनांमुळे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. याचा रेल्वे वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
Vasai casuarina tree, casuarina, Vasai ,
शहरबात… सुरूची वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर
Matsyagandha Express, Mumbai, Mangaluru, train safety, railway infrastructure, roof collapse, Linke Hoffman Busch (LHB) coaches, Southern Railway, passenger safety, Konkan Railway,
मृत्यूच्या छायेत प्रवाशांचा रेल्वे प्रवास, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग पडला
Ticket inspector beaten, Borivali Railway Police Station,
मुंबई : प्रवाशाकडून तिकीट तपासनीसला मारहाण, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MHADA, protest, MHADA restructured buildings,
म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींमधील रहिवाशांचा २८ ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावर मोर्चा

फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांनी समाजमाध्यमांवर सांगितले की, गुन्हेगारांना शोधण्यासाठी फ्रेंच गुप्तचर यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. अटल यांनी या घटनांना ‘पूर्वनियोजित’ म्हटले आहे. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याच्या काही ठिकाणांवरून काही लोक पळून जाताना आढळले आहेत. तेथून आग लावण्याची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, या घटनांमुळे पॅरिसला उर्वरित फ्रान्स आणि शेजारील देशांशी जोडणाऱ्या अनेक हाय-स्पीड लाईन्स ठप्प झाल्या आहेत, अशी माहिती वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी दिली.

हेही वाचा >>>Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

फ्रेंच अधिकाऱ्यांनी ऑलिम्पिकमध्ये व्यत्यय आणण्याचे अनेक डाव उधळून लावले आहेत. खेळात व्यत्यय आणण्याच्या नियोजनाच्या संशयावरून एका रशियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरील बासेल-मुलहाऊसचे फ्रेंच विमानतळ सकाळी रिकामे करण्यात आले आणि ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ तात्पुरते बंद ठेवण्यात आले. यामागे रेल्वे हल्ल्याचा संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणाऱ्या ट्रेनमधून दोन जर्मन खेळाडूंना रेल्वे मार्ग बंद झाल्यामुळे बेल्जियमला परतावे लागले.