scorecardresearch

Premium

हरभजन सिंगला ‘आप’कडून राज्यसभेची ऑफर ? स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं प्रमुखपदही मिळण्याची शक्यता

पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे.

harbhajan singh
फाईल फोटो

आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आप अर्थात आम आदमी पार्टीने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आता पक्षाकडून राज्यसभेत आपले बळ वाढवण्यावर विचार केला जातोय. आपतर्फे माजी क्रिकेकटपटू हरभजन सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. हरभजन सिंग यांच्याकडे पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपददेखील सोपवले जाण्याची शक्यता आहे.

पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी कोणाला संधी द्यावी यावर आपमध्ये चर्चा सुरु आहे. त्यासाठी पहिले नाव म्हणून हरभजन सिंग यांना निवडण्यात आल्याची चर्चा आहे. हरभजन सिंग यांना आप पक्षाकडून राज्यसभेसोबतच प्रस्तावित असलेल्या स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुख बनवले जाऊ शकते. सध्या आप पक्षाचे राज्यसभेमध्ये नारायणदास गुप्ता, शुशीललकुमार गुप्ता तसेच संजय सिंह असे तीन खासदार आहेत.

muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
Jayant Chaudhari
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न मिळताच आरएलडीची मोठी घोषणा, इंडिया आघाडीला धक्का?
mallikarjun kharge and bihar politics
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपाकडून प्रयत्न? १६ आमदारांची हैदराबादला रवानगी; बिहारमध्ये नेमके काय घडतेय?

निवडणूक जिंकल्यानंतर हरभजन सिंग यांनी भगवंत मान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटमध्ये हरभजन यांनी भगवंत मान यांना आपला मित्र म्हटलं होतं. हरभजन सिंग प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे त्याचा फायदा आपला होणार आहे. आपल्या करिअरमध्ये हरभजन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी घेतलेले आहेत.

आणखी वाचा >>> The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arvind kejriwal aap party may nominate harbhajan singh as rajyasabha canddate prd

First published on: 17-03-2022 at 12:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×