Arvind Kejriwal Attacked in Delhi Man Throws Liquid : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहायला मिळाली आहे. पोलीस केजरीवालांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीतल्या मालवीय नगर परिसरात केजरीवाल यांची पदयात्रा चालू होती. त्याचवेळी एका इसमाने सुरक्षा व्यवस्था भेदून केजरीवालांच्या जवळ जात त्यांच्या अंगावर एका द्रव पदार्थाचा शिडकावला केला. दरम्यान, आम आदमी पार्टीने म्हटलं आहे की “त्या इसमाने केजरीवाल यांच्या अंगावर स्पिरिट (ज्वलनशील पदार्थ) फेकलं, त्याच्या हातात काडीपेटी देखील होती. अरविंद केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा त्या इसमाचा प्रयत्न होता”. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, केजरीवालांवरील हल्ल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर सौरभ भरद्वाज यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघातील सावित्रीनगर परिसरात अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा चालू होती. या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. यामध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं व तरुणांची मोठी संख्या होती. केजरीवाल यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गल्लीबोळात लोक जमले होते. त्याचवेळी एका इसमाने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. मी स्वतः त्यावेळी केजरीवाल यांच्याबरोबर होतो. माझं जॅकेट देखील त्यावेळी भिजलं. त्या इसमाने केजरीवाल यांच्या अंगावर स्पिरिट फेकलं होतं. त्याने आमच्या अंगावर पाण्यासारखा द्रव पदार्थ फेकल्यानंतर मी व केजरीवालांनी वास घेऊन पाहिलं. आम्ही वासावरून ओळखलं की हे स्पिरिट होतं. त्या इसमाने केजरीवाल यांना जिवंत जाळण्याच्या प्रयत्न केला. त्याच्या एका हातात स्पिरिट तर दुसऱ्या हातात काडीपेटी होती.

Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !

हे ही वाचा >> बांगलादेशमधील हिंदूंसाठी RSS मैदानात; मोदी सरकारकडे केली मोठी मागणी, चिन्मय दास यांच्या अटकेबाबत म्हणाले…

आम आदमी पार्टीचे गंभीर आरोप

सौरभ भारद्वाज म्हणाले, “त्या इसमाने केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचे कार्यकर्ते देखील खमके आहेत. त्यांनी लगेच त्या हल्लेखोराला पकडलं. तो आमच्या अंगावर स्पिरिट फेकू शकला मात्र काडीपेटी पेटवू शकला नाही. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज भर रस्त्यात जिवंत पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही खूप गंभीर बाब आहे. केजरीवाल यांनी पदयात्रा सुरू केल्यापासून त्यांना लोकांकडून मिळणारं समर्थन वाढतंय. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे जी दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची झोप उडाली आहे. त्यांचे नेते सैरभैर जाले आहेत. ते तिसऱ्यांदा दिल्लीत विधानसभा निवडणूक पराभूत होणार आहेत. सध्या त्यांची बिकट परिस्थिती दिसत आहे. त्यामुळेच ते लोक अशा कुरापती करत आहेत. केजरीवालांवर झालेला हा काही पहिला हल्ला नाही. यापूर्वी देखील असे अनेक प्रयत्न झाले आहे. मात्र, अशा हल्ल्याने केजरीवाल थांबणार नाहीत. ते आजवर थांबले नाहीत, घाबरले नाहीत. पुढेही थांबणार नाहीत. त्यांचा प्रवास चालूच राहील. ते लोकांची सेवा करत राहतील.

हे ही वाचा >> Cyclone Fengal : तामिळनाडू-पद्दुचेरीत काही वेळातच धडकणार चक्रीवादळ फेंगल; चेन्नईसह अनेक ठिकाणी रेड अलर्ट

केजरीवालांवर सलग तीन हल्ले

भारद्वाज यांनी सांगितलं की “यापूर्वी विकासपुरीमध्ये देखील केजरीवाल यांच्यावर अशाच पद्धतीचा हल्ला झाला होता. तेव्हा देखील पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, हसत होते. पोलीस त्यावेळी त्या गुंडांसमोर हात जोडत होते. त्यानंतर काल बुराडीमध्ये देखील केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला. आज त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला. मात्र पोलीस त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेकडे लक्ष देत नाहीत.