Arvind Kerjiwal दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? याचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. कथित मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक मनू सिंघवी हे अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडत आहेत. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली आहे. लोकसभा निवडणूक असल्याने त्यांना काही कालावधीसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती जी संपली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले?

माझे अशील अरविंद केजरीवाल यांचं नाव सीबीआयच्या FIR मध्ये नाही. तसंच माझे अशील अरविंद केजरीवाल हे काही रिस्क फॅक्टर नाहीत. तसंच या प्रकरणातले सहआरोपी मनिष सिसोदिया आणि विजय नायर यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी जामीन मागितला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तर्फे दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यांच्या अटकेविरोधात जामीन मिळावा यासाठीच्या या याचिका आहेत. सीबीआयने आपल्याला अटक करण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही यासंबंधीची याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची सुनावणी पार पडली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Rupali Patil Thombare VS Rupali Chakankar
NCP Ajit Pawar Group : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर
naom chomsky on pm narendra modi nda government
SAU Professor Resigned: मोदी सरकारवर टीकेचा फक्त संदर्भ दिला म्हणून वरीष्ठ प्राध्यापकावर कारवाई; म्हणाले, “न्यायाची कोणतीही शक्यता…”
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue Collapse
Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue: पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधींनी सांगितली तीन कारणे…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा

आपसाठी महत्त्वाची बाब काय?

काही आठवड्यांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सर्वोच्च न्यायालयाने विजय नायर यांना जामीन मंजूर केला आहे. आपचे संपर्क प्रमुख होते त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावेळी त्या पदावर ते कार्यरत होते. तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचीही सुटका करण्यात आली आहे. आता यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक

२१ मार्च २०२४ या दिवशी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. ज्यानंतर त्यांना अटक झाली. लोकसभा निवडणूक असल्याने अरविंद केजरीवाल यांना जामीनही देण्यात आला होता. मात्र नंतर त्यांना सीबीआयने अटक केली. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी जामीन अर्ज केला आहे. मात्र ती सुनावणी पार पडली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय अरविंद केजरीवाल यांना दिलासा देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.