Arvind Kejriwal Car Attacked : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. यातच आज (१८ जानेवारी) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल हे प्रचारासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले असून तसेच अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक करणारे भाजपाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांचे समर्थक असल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओही ‘आप’ने एक्सवर शेअर केला आहे, तर आम आदमी पक्षाने केलेले आरोप प्रवेश वर्मा यांनी खोटे असल्याचं म्हटलं आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांच्याच गाडीने भाजपाच्या दोन समर्थकाला धडक दिल्याचा आरोप प्रवेश वर्मा यांनी केला आहे. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपामुळे दिल्लीत सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.

Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?

आम आदमी पक्षाने काय आरोप केले?

आम आदमी पक्षाने अधिकृत एक्स (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “दिल्ली निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपा घाबरला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. अरविंद केजरीवाल हे प्रचार करत असताना भाजपाचे प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला, तसेच अरविंद केजरीवाल यांनी प्रचार करू नये, म्हणून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या लोकांनो, केजरीवाल अशा भ्याड हल्ल्याला घाबरत नाहीत, दिल्लीची जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल”, असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

प्रवेश वर्मा यांनी काय आरोप केला?

आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपाला उत्तर देताना भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरच आरोप केला आहे. प्रवेश वर्मा यांनी म्हटलं आहे की, “अरविंद केजरीवाल यांच्या गाडीने भाजपाच्या दोन समर्थकांना धडक दिली. त्यामध्ये एका कार्यकर्त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्या दोन कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, निवडणुकीतील पराभव पाहून अरविंद केजरीवाल हे लोकांच्या जीवाचे मोल विसरले आहेत. तसेच माझ्या समर्थकांची प्रकृती जाणून घेण्यासाठी मी रुग्णालयात जात आहे”, असं प्रवेश वर्मा यांनी म्हटलं.

दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं?

आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. मात्र, दिल्लीच्या पोलिसांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Story img Loader