माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सातही आरोपींना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो, असे केजरीवाल म्हणाले.
तामिळनाडू सरकारने अशा प्रकारचा निर्णय घ्यावयास नको होता. अशा प्रकारे सर्वाची सुटका करण्यास सुरुवात केली तर चुकीचा संदेश त्यामधून दिला जातो, असे केजरीवाल म्हणाले. आम आदमी पार्टीला(आप) महागाई, गॅसचे दर याबाबत राजकारण करण्यात रस आहे, धर्माच्या राजकारणात रस नाही, असेही केजरीवाल यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.खरोखरीच जर देशाच्या पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांची अशी सुटका केली जात असेल तर सामान्य माणसाला सुरक्षित कसे वाटू शकेल, असा सवाल त्यांनी केला.