Delhi MCD Election: "आम्हाला पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि केंद्राचं..."; 'आप'च्या ऐतिहासिक विजयानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया | Arvind Kejriwal on Municipal Corporation of Delhi MCD AAP Win says Need Centre Cooperation PM Blessings scsg 91 | Loksatta

Delhi MCD Election: “आम्हाला पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि केंद्राचं…”; ‘आप’च्या ऐतिहासिक विजयानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

Delhi MCD Election 2022 Result Updates: तब्बल १५ वर्षानंतर दिल्ली मनपामधून भाजपा पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Delhi MCD Election: “आम्हाला पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि केंद्राचं…”; ‘आप’च्या ऐतिहासिक विजयानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया
कार्यकर्त्यांशी संवाद साधाना केलं विधान (फोटो- एएनआय आणि ट्वीटरवरुन साभार)

Arvind Kejriwal on Delhi MCD Polls Result 2022: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि केंद्र सरकारचं सहकार्य हवं आहे, असं केजरीवाल यांनी १५ वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेतील सत्ता संपुष्टात आणल्यानंतर म्हटलं आहे.

“माझंही तुमच्यावर प्रेम आहे,” अशी आपल्या भाषणाला सुरुवात करत केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानले. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांना केजरीवाल यांनी संबोधित केलं. ‘आप’च्या विजयामुळे दिल्लीमध्ये आता डबल इंजिनचं सरकार असणार आहे. २०१५ पासून या ठिकाणी राज्यात ‘आप’ची सत्ता असून आता महानगरपालिकेवरही आपने झेंडा फडकवला आहे.

भाजपाने अनेक मार्गावर आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. केंद्रातील सरकार, नायाब राज्यपाल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपाने आमची अडवणूक केली असं ‘आप’ने म्हटलं आहे. “आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. आम्हाला पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आहे,” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीमधून लोकांना सकारात्मक राजकारणाची आवश्यकता असून नाकारात्मक राजकारण त्यांनी दूर केलं आहे, असंही केजरीवाल म्हणाले. “मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की आझपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला भाजपा आणि काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू”, असंही केजरीवाल म्हणाले.

नक्की वाचा >> Delhi MCD Election Result : दिल्ली महापालिका निवडणुकीतील ‘आप’च्या विजयावर मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दुपारी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आम आदमी पार्टील १३४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ नऊ जागा जिंकता आल्या आहेत आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:30 IST
Next Story
Video: “तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून…”; सुनावणीदरम्यान हायकोर्टातील न्यायमूर्तींचा सरकारी अधिकाऱ्याला अजब प्रश्न