नवी दिल्ली : ‘काश्मीर फाइल्स’ अधिकाधिक लोकांनी पाहावा असे भाजपला वाटत असल्याने हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजप करत आहे. पण हा चित्रपट करमुक्त करण्याची गरज काय? चित्रपटनिर्माते विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट यू टय़ुबवर टाकायला सांगा, सगळे पाहतील, अशी खरमरीत टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी गुरुवारी केली.

दिल्लीच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपच्या आमदारांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणी करत कामकाजात अडथळे आणले. त्याला केजरीवाल यांनी विधानसभेत प्रत्युत्तर देताना भाजपला टोमणे मारले. भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हिमालच प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.  

BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
BJP Candidate Tenth List for Lok Sabha
मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग
Union Home Minister Amit Shah expressed confidence that he will win more seats in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात अधिक जागा जिंकू – शहा

‘देशभरातील भाजपवाले गल्लीबोळात या चित्रपटाची भित्तीचित्रे लावत फिरत आहेत. असे फलक लावून राजकारण केले जाते का, घरी जाऊन तुम्ही पोराबाळांना काय सांगणार, आम्ही फलक लावत हिंडत होतो.. केंद्रात ८ वर्षे सत्ता चालवल्यानंतर पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्री यांच्या चरणी जावे लागत असेल तर अशा पंतप्रधानांचा उपयोग काय, त्यांनी ८ वर्षांत एकही काम केले नाही असे म्हणायचे का.. हेच लोक आम्हाला हा चित्रपट करमुक्त करायला सांगत आहेत. कशाला करमुक्त करायचा, त्यापेक्षा यूटय़ुबवर टाका, एका दिवसांत सगळे चित्रपट बघतील, अशी उपहासात्मक टीका केजरीवाल यांनी केली. 

‘आता तरी डोळे उघडा!’

हरियाणामध्ये भाजपच्या आमदाराने ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट सार्वजनिक ठिकाणी मोफत दाखवला तर, विवेक अग्निहोत्रींनी लगेच ट्वीट करून त्यावर आक्षेप घेतला. लोकांनी सिनेमाचे तिकीट खरेदी करून तो पाहिला पाहिजे, असा आग्रह त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे धरला. काश्मिरी पंडितांच्या नावाखाली काही लोक कोटय़ावधी रुपये कमवत आहेत आणि तुम्ही (भाजप) भित्तीचित्र लावत फिरत आहात. तुम्हा काय करता आहात, आता तरी डोळे उघडा. तुम्हाला शेळय़ा-मेंढय़ांची वागणूक दिली जात आहे’, असा टोमणा केजरीवाल यांनी मारला.