सौम्य हिंदुत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अरविंद केजरीवाल यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “हनुमान चालीसा….”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद त्यांच्या सौम्य हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे चर्चेत आले आहेत.

Arwind-Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद त्यांच्या सौम्य हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावर उत्तर देताना त्यांनीच हनुमान चालीसा म्हणणे पाप आहे का?, प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे पाप आहे का?  असा प्रश्न विचारला. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते असं करतात तेव्हा इतर पक्षाचे लोक त्यांना शिव्या देतात. अरविंद केजरीवाल यांनीही टाइम्स नाऊ नवभारत समिटमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट केली.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मते, सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते हिंदुत्व नाही. ते म्हणाले की, “भगवान श्रीराम हे प्रत्येक हिंदूचे आराध्य दैवत आहेत. माझ्या मते, रामचंद्रांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, त्यांचे बोलणे, त्यांचे शब्द हे माझ्यासाठी हिंदुत्व आहे. प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि आचरण हेच खरे हिंदुत्व आहे. मला देशातील १३० कोटी लोकांना एकत्र करायचे आहे. मला माणसाला माणसाशी जोडायचे आहे. आणि देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. माझा आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे,” असा दावाही केजरीवाल यांनी केला.

“धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे हे हिंदुत्व नसून एका माणसाला दुसऱ्या माणसाशी जोडणे म्हणजे हिंदुत्व आहे. आज हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते हिंदुत्व नाही. हे लोक सोशल मीडियावर लोकांना घाणेरड्या शिव्या घालतात, धमक्या देतात, हे हिंदुत्व नाही,” असे ते म्हणाले.

दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी, अजमेर, अयोध्या आणि इतर धार्मिक स्थळांच्या यात्रेला नेण्यासाठी ‘तीर्थ यात्रा’ योजनेला त्यांच्या सरकारने मान्यता दिल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, प्रत्येकाच्या आध्यात्मिक गरजा आहेत आणि दिल्ली सरकार त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात चुकीचं काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arvind kejriwal talks about soft hindutva questions about hanuman chalisa hrc

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या