दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दिल्लीतल्या महिलांना दर महिन्याला १,००० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यातच केजरीवाल यांना गेल्या महिन्यात २१ मार्च रोजी ईडीने अटक केली. त्यामुळे अनेक सरकारी योजना प्रलंबित आहेत. तसेच राज्याच्या कारभारात अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान, केजरीवाल तुरुंगात असल्याने दिल्ली सरकारचं वीज आणि पाण्यावरील अनुदान (सबसिडी) आणि महिलांचा बसमधून होणारा मोफत प्रवास बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

सरकारी योजना आणि अनुदान बंद होणार असल्याच्या अफवा पसरू लागल्यानंतर दिल्ली सरकारने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, कोणतीही योजना किंवा अनुदान बंद केलं जाणार नाही. यावरून स्पष्ट झालं आहे की, दिल्ली सरकार पाणी आणि वीजेवरील अनुदान बंद करणार नाही. तसेच दिल्लीतल्या महिला डीटीसी बसमधून मोफत प्रवास करू शकतात. यासह इतर योजनादेखील चालू राहतील.

Talathi, molested, teacher,
वसई : अखेर शिक्षिकेचा विनयभंग करणारा तलाठी निलंबित, संतप्त वसईकरांचे तहसीलदार कार्यालयावर आंदोलन
Raksha Khadse and Eknath Khadse
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : सुनेला मंत्रिपदाची संधी मिळाल्यावर सासऱ्यांचे डोळे पाणावले; रक्षा खडसेंना आमंत्रण आल्यावर एकनाथ खडसे म्हणाले…
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Chandrapur lok sabha seat, Congress MP Pratibha Dhanorkar s Claim of bjp office bearers Support her in election, Chandrapur bjp office bearers,
चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…
uddhav Thackeray stronghold fort Shaken by victory of narayan rane in sindhudurg ratnagiri lok sabha constituency election 2024
नारायण राणेंच्या विजयामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग
bjp already has sufficient numbers to form the government says hm amit shah zws
सरकार बनवण्यासाठी पुरेसे संख्याबळ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा, विरोधी पक्षाचा निर्णय जनतेकडे
Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
Ravindra Dhangekar on Pune Police Commissioner Amitesh Kumar
“बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी (२९ एप्रिल) तिहार तुरुंगात जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आतिशी म्हणाल्या, केजरीवाल यांना तुरुंगातही दिल्लीतल्या जनतेची चिंता आहे. मी त्यांना विचारलं की, ते कसे आहेत? त्यावर ते म्हणाले, तुम्ही माझी काळजी करू नका, माझ्या आरोग्याची देखील काळजी करू नका. दिल्ली सरकारचं काम कसं चाललंय ते सांगा. शाळेतल्या मुलांना वेळेवर पुस्तकं मिळतायत का? विद्यार्थ्यांचं शिक्षण वेळेवर चालू आहे ना? शाळांमध्ये कुठलीही अडचण नाही ना? मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधं वेळेवर पोहोचतायत की नाही? अनेक ठिकाणांहून तक्रारी येत होत्या की, मोहल्ला क्लिनिकमध्ये पुरेशी औषधं नाहीत. ती समस्या आपण सोडवली का? उन्हाळा वाढलाय त्यामुळे दिल्लीत पाण्याची समस्या निर्माण झाली असेल कुठेही पाणी कमी पडता कामा नये.

हे ही वाचा >> “अजित पवार अप्रत्यक्षपणे हेच सांगत आहेत की ते स्वार्थी…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

आतिशी म्हणाल्या, केजरीवाल यांचं तुरुंगातून दिल्ली सरकारच्या योजनांकडे लक्ष आहे. त्यांनी तुरुंगातून दिल्लीतल्या महिलांना एक संदेश पाठवला आहे. ते म्हणाले, मी लवकरच तुरुंगाबाहेर येईन आणि दिल्लीतल्या महिलांना दर महिन्याला १,००० रुपये देण्याचं वचन पूर्ण करेन.