Asaduddin Owaisi on India China troops clashed near LAC in Arunachal: अरुणाचल प्रदेशजवळच्या सीमाभागामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.  या चकमकीत भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गुवाहाटीत उपचार सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ म्हणजेच ‘एआयएमआयएम’चे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनीही या प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींचं नेतृत्व सक्षम नसल्याने असा अपमान सहन करावा लागत असल्याचं म्हटलं आहे.

भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक

‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

गलवाननंतर पहिलाच संघर्ष

लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, तर अनेक जखमी झाले होते. अरुणाचल सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या कथित चकमकीच्या घटनेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे, मात्र तपशील देण्यास वा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात लष्कराला प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती, मात्र लष्कराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्तात म्हटले आहे.

ओवेसींची प्रतिक्रिया…

ओवेसींनी या घडलेल्या प्रकरणासंदर्भात ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे. “अरुणाचलमधून समोर येत असलेली माहिती चिंता व्यक्त करण्यासाठी आणि धोक्याचा इशारा देणारी आहे. भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये मोठा संघर्ष झाला आहे. मात्र सरकारने यासंदर्भात अनेक दिवस देशाला अंधारात ठेवलं. अधिवेशन सुरु असतानाही याबद्दल संसदेत माहिती का देण्यात आली नाही?” असा सवाल त्यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या मोदी सरकारला विचारला आहे.

ओवेसी म्हणतात या प्रश्नांचं काय?

भारत-चीन सैन्यसंघर्षासंदर्भातील अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचंही ओवेसींनी म्हटलं आहे. “या संघर्षासंदर्भातील माहिती अपुऱ्या स्वरुपाची आहे. नेमका संघर्ष कशामुळे झाला? गोळीबार झाला की गलवानप्रमाणे संघर्ष झाला? किती सैनिक जखमी झाले? त्यांची सध्याची परिस्थिती काय? संसदेच्या माध्यमातून लोकांचं समर्थन सैनिकांना देऊन चीनला कठोर शब्दांमध्ये संदेश का दिला जात नाही?” असे प्रश्न ओवेसी यांनी उपस्थिती केले आहेत.

…म्हणून अपमान सहन करावा लागतो

ओवेसींनी या प्रकरणावरुन भारतीय लष्कर नाही तर राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा टोला केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लगावला आहे. “भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी चिनी लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. मात्र मोदींच्या दुबळ्या राजकीय नेतृत्वामुळे आपल्याला चीनविरोधात अशाप्रकारचा अपमान सहन करावा लागतो. यासंदर्भात संसदेमध्ये तातडीने चर्चा होणं गरदेचं आहे. या प्रकरणी मी स्थगिती प्रस्ताव मांडणार आहे,” असं ओवेसी म्हणालेत.

जवानांवर गुवाहाटीत उपचार?

चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाल्याचा दावा एका लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. मात्र या चकमकीत भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गुवाहाटीत उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चकमक झाली तेव्हा ६०० चिनी सैनिक होते, अशीही माहिती आहे.

नक्की वाचा >> अरुणाचलमध्ये भारत-चीन लष्करी संघर्ष: “मोदींनी स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात टाकलं, LAC पासून १५ ते १८ किमी आतपर्यंत…”

गलवान नंतरची पहिलीच घटना

लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. गलवान चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

तवांग क्षेत्रातील सज्जता..

चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन तवांग सीमा क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या अद्ययावतीकरणासह अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळतही ठेवण्यात येते.