Former India pacer and BJP MLA Ashok Dinda Moyna constituency West Bengal Election Results 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा, २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये ‘मोयना’ मतदारसंघातून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सध्या आघाडीवर आहेत. ४२ वर्षीय आणि भाजपाचे विद्यमान आमदार असलेल्या दिंडांसमोर तृणमूल काँग्रेसच्या चंदन मंडल यांचे कडवे आव्हान आहे.
अशोक दिंडा यांनी एम.एस. धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नेतृत्वाखाली भारतासाठीही क्रिकेट खेळले आहे. याचबरोबर ते आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरिअर्स इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याकडून आयपीएल मध्येही खेळले आहेत.
अटीतटीची लढत
अशोक डिंडा, मागील निवडणुकीत अवघ्या १,२०० मतांच्या निसटत्या फरकाने जिंकलेली आपली जागा राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरुवातीचे कल पाहता, ही लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे.
दिंडा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आणि बंगाल क्रिकेटसाठी ‘व्हिजन कोच’ म्हणून बजावत असलेल्या भूमिकेचा समतोल साधला आहे. दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी तो आपल्या क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्धीवर आणि स्थानिक जनसंपर्कावर अवलंबून आहेत.
या निवडणुकीत अशोक डिंडा यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसच्या चंदन मंडल यांचे आव्हान आहे. मतमोजणी सुरू असताना, स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी या लढतीचे वर्णन सध्या अत्यंत चुरशीची लढत असे केले आहे.
‘मोयना’ येथील निकालाकडे ग्रामीण बंगालमधील भाजपाच्या ताकदीचा एक महत्त्वपूर्ण निदर्शक म्हणून पाहिले जात आहे. आपण प्रत्यक्ष तळागाळापर्यंत केलेल्या कामामुळे अखेरीस आपलाच विजय होईल, याबद्दल दिंडा आशावादी आहेत.
६ हजार मतांची आघडी
निवडणूक आयोगाच्या दुपारी ४:०० वाजेपर्यंतच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील ‘मोयना’ मतदारसंघात, भाजपाचे विद्यमान उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा हे सध्या ८१,६३२ मतांसह मतमोजणीत आघाडीवर आहेत. त्यांचे टीएमसीचे प्रतिस्पर्धी चंदन मंडल यांना आतापर्यंत ७४,८०१ मते मिळवली आहेत. दिंडा यांची सध्याची आघाडी ६,८३१ मतांची आहे. दरम्यान, मतमोजणी अजूनही सुरू असून अंतिम निकाल जाहीर होणे बाकी आहे.
डिंडा यांची क्रिकेट कारकिर्द
अशोक दिंडा यांनी ९ डिसेंबर २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी आपला पदार्पणाचा टी२० सामना खेळला होता, तर २८ मे २०१० रोजी झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १८ एप्रिल २००८ रोजी झालेल्या पहिल्या-वहिल्या आयपीएल सामन्यात, त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते.
