बिहारच्या कटिहार जिल्ह्य़ातील कुरसेला परिसरात असलेल्या एका प्राचीन मंदिरातून विविध देवतांच्या अष्टधातूच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटय़ांनी मुरादपूर ठाकूरबारी मंदिर फोडून प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणपती अशा अष्टधातूच्या सहा मूर्ती पळविल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेशकुमार यांनी सांगितले. पळविण्यात आलेल्या मूर्ती अष्टधातूच्या असून त्यापैकी काही मूर्ती १०० वर्षांहून अधिक जुन्या असल्याचे मंदिराचे पुजारी जयप्रकाश यांनी सांगितले. काकड आरतीसाठी जयप्रकाश यांनी मंदिराचे दरवाजे उघडले असता मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार आढळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Story img Loader