आसाममध्ये रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत १० जण ठार

ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे. 

गुवाहाटी : आसाममधील करीमगंजमध्ये एका रिक्षाने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात छठ पूजेवरून परतणाऱ्या चार महिला आणि दोन मुलांसह दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आसाम-त्रिपुरा महामार्गावरील बैठाखल भागात पाथरकंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. ट्रक अति वेगात असल्याने रिक्षात बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला. ९ जणांचा जागीत मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चहाच्या बागेत काम करणाऱ्या मजुरांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. मृतांमध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे. तर ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे.  या घटनेनंतर स्थानिकांनी आसाम आणि त्रिपुरा महामार्ग अडवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assam 10 killed in truck autorickshaw collision zws

ताज्या बातम्या