गुवाहाटी : आसाममध्ये पूरपरिस्थिती अद्यापही बिकट आहे. या संकटाचा ४५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना तडाखा बसला असून गेल्या २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आता बळींची संख्या १०८ झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे पाणी शुक्रवारी ओसरत असले तरी त्यांच्या उपनद्या अद्यापही तुडूंब वाहत आहेत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या आपत्तीत आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांतील सात बळींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बराक खोऱ्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सिलचरचा बहुसंख्य भाग हा पाण्याखाली आहे, असे जिल्ह्यातील अधिकाऱ्याने सांगितले. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) सांगितले की, पूरग्रस्त भागात विशेषत: कछार जिल्ह्यातील  नागरिकांच्या मदतीसाठी  अधिक जवान पाठवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam 7 more flood victims situation state dire 108 deaths ysh
First published on: 25-06-2022 at 02:02 IST