गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये काही विद्यमान आमदारांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन प्रमुख राजकीय नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गौरव गोगोई यांना प्रतिष्ठेच्या जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
सध्या तिथे भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी आमदार आहेत. गौरव गोगोई पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत ते लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया हे नाझिरा तिसऱ्यांदा निवडणूक लढवतील, त्यांचे वडील हितेश्वर सैकिया आणि आई हेमोप्रवा सैकिया याही नाझिरामधून आमदार झाल्या आहेत. नंदिता दास, दिगंत बर्मन आणि नुरुल हुडा यांचेही नाव पहिल्या यादीत आहे.
