Assam Election Results BJP vs Congress LIVE Battle : आसाममधील १२६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (४ मे) आज होणार आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्ता राखणार की काँग्रेस (आसाम संमिलित मोर्चा) मुसंडी मारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावर्षी आसाममध्ये ८५.३८% इतके विक्रमी मतदान झाले आहे, जे १९५१ नंतरचे सर्वाधिक आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजला ८० ते १०० पेक्षा जास्त जागा मिळवून स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील १२६ विधानसभा मतदारसंघांतील ७२२ उमेदवारांचे भवितव्य दर्शवणारे ईव्हीएम ४० मतमोजणी केंद्रांवर उघडण्यात येतील. १२६ जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजता राज्यातील विविध केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली आहे. निकालासाठी मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममधील १२६ जागांसाठी विधानसभा निवडणुकांचे निकाल या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Assam Election Results 2026 LIVE Updates : आसामध्ये एनडीए आघाडीवर; भाजप कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
आसाममध्ये एनडीए मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे स्पष्ट होताच, सोमवारी दुपारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
गुवाहाटीमधील वशिष्ठ भागातील 'वाजपेयी भवन' या भाजप मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भगवा ध्वज घेऊन ढोल-ताशांच्या गजारात नृत्य केले. एकमेकांना गुलाल लावून शुभेच्छा दिल्या. ‘जय आई असोम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, असाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांपैकी ९८ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. आसाममध्ये सत्ता स्थापनेसाठी ६४ हा बहुमताचा आकडा आहे. सध्याचे कल पाहता, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार येण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांचा जोरहाटमध्ये पराभव
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांचा जोरहाट विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपचे विद्यमान आमदार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा २३,१८२ मतांच्या फरकाने पराभव केला. ते सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. सध्या ते लोकसभेत विरोधी पक्ष उपनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी याच 'जोरहाट' मतदारसंघातून भाजपच्या तोपण कुमार गोगोई यांचा पराभव केला होता.
आसाम निवडणूक निकाल प्रसिध्द झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपचे हितेंद्रनाथ गोस्वामी जोरहाट मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांचा २३,१८२ मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : बोडोलँड पीपल्स फ्रंटने पहिली जागा जिंकली
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बोडोलँड पीपल्स फ्रंटचे चरण बोरो यांनी मझबत मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी ही जागा ५५,५४६ मतांच्या फरकाने जिंकली असून, त्यांच्या पक्षासाठी ही या निवडणुकीतील पहिलीच जागा आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपचा पहिला विजय
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने धेमाजी मतदारसंघातून आपला पहिला विजय मिळवला आहे. भाजपचे रणोज पेगू ३२,२२९ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शैलेंद्र सोनोवाल यांचा पराभव केला.
Assam Election Results 2026 LIVE Updates : शिवसागरमध्ये अखिल गोगोई आघाडीवर
'रायजोर दल'चे प्रमुख अखिल गोगोई यांनी शिवसागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या ८ व्या फेरीअखेर ते ६,८३७ मतांनी पुढे आहेत.
सुरुवातीला ते भाजपचे उमेदवार आणि माजी उल्फा (ULFA) नेते कुशल दुवारी यांच्यापेक्षा मागे होते, पण आता त्यांनी आघाडी मिळवली आहे. गोगोई यांनी २०२१ मध्ये सुद्धा याच मतदारसंघातून विजय मिळवला होता.
Assam Election Results 2026 LIVE Updates : 'येथे डबल-इंजिन सरकार खूप महत्त्वाचे आहे,' - भाजपा खासदार बैजयंत जय पांडा यांची प्रतिक्रिया
भाजप खासदार बैजयंत जय पांडा म्हणाले, “आसाममधील सध्याचे कल पाहता भाजपचा मोठा विजय निश्चित दिसत आहे. मी आसामच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी पंतप्रधान मोदीजी आणि येथील 'डबल-इंजिन' सरकारला जो पाठिंबा दिला आहे, तो आसामच्या भविष्यासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
ते पुढे म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती असून, हा विजय देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल."
Assam Election Results 2026 LIVE Updates : बिहपुरियामध्ये भूपेन कुमार बोरा पिछाडीवर
आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा, जे यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, ते बिहपुरिया मतदारसंघात १,४९४ मतांनी पिछाडीवर आहेत.
एजीपीचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणतात, “ही एक चांगली सुरुवात आहे. मला खात्री आहे की आपण जिंकू… एनडीए पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे आमच्या सरकारने आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आसामच्या विकासासाठी काम केले आहे, त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे… काँग्रेसने राज्यातील जनतेसाठी काहीही केले नाही आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही.. भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जिंकेल आणि हिमंता बिस्वा सरमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील.”
आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने मुसंडी मारली असून, सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. मात्र, याच दरम्यान आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांनी मतमोजणीच्या संथ गतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
जोरहाट येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गौरव गोगोई यांनी 'तितबोर' विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, "तितबोरमध्ये मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ही गती कमी का आहे, याबाबत आम्ही विचारणा केली आहे. प्रत्येक फेरीत आकडेवारी वर-खाली होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत सर्वांनी संयम राखला पाहिजे."
न्यू गुवाहाटी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शांतनु बोरा म्हणतात, “आमच्यात खूप चांगली लढत झाली. भाजपाचे उमेदवार दिप्लू रंजन आणि मी आता खूप चांगले मित्र झालो आहोत, आणि मला आशा आहे की काँग्रेस पक्ष जिंकेल.
कोण जिंकेल हे आताच सांगणे खूप घाईचे होईल, पण तरीही, मी त्यांना शुभेच्छा देतो, आणि त्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आहे…”
Assam Election Results 2026 LIVE Updates : राज्यांमध्ये भाजपा १०० जागांवर आघाडीवर
भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी आघाडीवर असलेल्या मतदारसंघांची संख्या १०० जागांच्या आकड्यावर पोहोचली आहे.
जलुकबारी, जोरहाट आणि शिवसागर या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्येही भगवा पक्ष आघाडीवर आहे, जिथे अनुक्रमे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, आसाम काँग्रेसचे प्रमुख गौरव गोगोई आणि रायजोर दलचे प्रमुख अखिल गोगोई निवडणूक लढवत आहेत.
यापूर्वी, भाजपा नेते दिलीप सैकिया म्हणाले, “आमच्याकडे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ असेल, पण आम्ही मित्रपक्षांना नक्कीच सोबत घेऊ.” आसाम विधानसभेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी आघाडीला किमान ६४ जागा जिंकणे आवश्यक आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : 'काही प्रतिक्रिया द्यायला अजून थोडा वेळ लागेल,' असे पीयूष हजारिका म्हणाले.
'काही प्रतिक्रिया द्यायला अजून थोडा वेळ लागेल,' असे पीयूष हजारिका म्हणाले.
आसाममधील दोन-तृतीयांश विधानसभा जागांवर भाजपने आघाडी घेतल्याने, जागीरोडचे पक्षाचे उमेदवार पीयूष हजारिका म्हणाले, “आसाममध्ये ३-४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, हे सुरुवातीचे कल आहेत. काहीही सांगायला अजून थोडा वेळ लागेल… मला आशा आहे की दुपारी साडेबारा वाजेपर्यंत काही निकाल दिसतील.”
Assam Election Results 2026 LIVE Updates : आसाममधील प्रमुख मंत्री आघाडीवर
अतुल बोरा (एजीपी) - बोकाखात - ३,००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर (पहिल्या फेरीनंतर ४,६८२ विरुद्ध १,४४०)
चंद्र मोहन पटोवारी (भाजप) - तिहू - ५,४६८ मतांनी आघाडीवर (दुसऱ्या फेरीनंतर १०,९९१ विरुद्ध ५,५२३)
केशव महंत (एजीपी) - मतदारसंघ अनिर्दिष्ट - ८,८०० हून अधिक मतांनी आघाडीवर
रणजीत कुमार दास (भाजप) - भवानीपूर-सोरभोग - ६५८ मतांनी आघाडीवर (चौथ्या फेरीनंतर १९,४४४ विरुद्ध १८,७८६)
अजंता निओग (भाजप) - गोलाघाट - ११,०००+ मतांनी आघाडीवर
पिजूष हजारिका (भाजप) - जागीरोड - १६,००० मतांनी आघाडीवर (पाचव्या फेरीनंतर)
अशोक सिंघल (भाजप) - ढेकियाजुली - ३,२३० मतांनी आघाडीवर (पहिल्या फेरीनंतर)
रानोज पेगू (भाजप) - धेमाजी - १५,०००+ मतांनी आघाडीवर (६व्या फेरीनंतर)
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई म्हणतात, “टिटाबोर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी खूप हळू सुरू असल्याचे आम्ही पाहत आहोत.
टिटाबोर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी का संथ आहे, हे आम्ही नुकतेच आतमध्ये सांगितले आहे… प्रत्येक फेरीत चढ-उतार होणारच; हे स्वाभाविक आहे. अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे.”
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपा ९७ जागांवर आघाडीवरदिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर जल्लोष
आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केल्याने आणि पश्चिम बंगालमध्ये आघाडी घेतल्याने भाजपा मुख्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे. मतमोजणी सुरू आहे.
आसाममध्ये पक्ष ९७ जागांवर आघाडीवर आहे.
“आमच्याकडे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ असेल, पण आम्ही मित्रपक्षांना नक्कीच सोबत घेऊ,” असे भाजपचे दिलीप सैकिया म्हणाले, कारण त्यांच्या पक्षाने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे.
आसाम विधानसभेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी आघाडीला किमान ६४ जागा जिंकणे आवश्यक आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपा ९८ जागांवर आघाडीवर
भाजप+ ९८
काँग्रेस+ २६
एआययूडीएफ+ १
केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल म्हणाले, “निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच लागेल. भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार स्थापन होईल.
आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत १०० (जागांच्या) जवळ पोहोचलो आहोत, या आत्मविश्वासाने आम्ही हे म्हटले होते.”
Assam Election Results 2026 LIVE Updates : हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी गौरव गोगोई यांना टाकले मागे
जोरहाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांच्यावर मात केली आहे.
ECI च्या आकडेवारीनुसार, गोस्वामी ४१३२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपा ९३ जागांवर आघाडीवर
भाजप+ ९३
काँग्रेस+ २५
एआययूडीएफ+ १
Assam Election Results 2026 LIVE Updates : मंडिया, पाकाबेतबारी आणि मंगलदाई येथे काँग्रेसची आघाडी
मतमोजणी सुरू होऊन दीड तास झाला असून, निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदारसंघनिहाय आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांपैकी ३८ जागांवर आघाडी मिळाली आहे. दिवसाची सुरुवातच असली तरी, हे सुरुवातीचे कल काँग्रेससाठी चिंतेचे कारण ठरू शकतात.
राज्यात दशकभर सत्तेबाहेर राहिल्यानंतर पुनरागमनाची आशा बाळगून असलेल्या काँग्रेसला यापैकी केवळ तीन जागांवरच सुरुवातीची आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये मांडिया, पाकाबेतबारी आणि मंगलदाई, या सर्व जागा खालच्या आणि मध्य आसाममधील जागा आहेत. पूर्व किंवा उत्तर आसाममध्ये आपले नशीब पालटण्यासाठी काँग्रेस पक्ष कठोर प्रयत्न करत आहे, जिथून गेल्या काही वर्षांत विधानसभेतील त्यांचे प्रतिनिधित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे.
आज सोमवारी आसामच्या १२६ सदस्यीय विधानसभेसाठी मतमोजणी सुरू झाली असताना, बिहपुरियाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भूपेन कुमार बोरा यांनी विश्वास व्यक्त केला की, "लोकांनी विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी मतदान केले असून, पक्ष ९० पेक्षा जास्त जागा जिंकेल."
"आसामची जनता हिमंता बिस्वा सरमा यांच्या पाठीशी उभी राहिली आहे, कारण लोकांना विकास हवा आहे. लोकांनी यापूर्वी झालेला विकास पाहिला आहे आणि आता तोच पुढे चालू राहावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे एक मत आहे, जे आपल्याला काही तासांत कळेल," असे बोरा म्हणाले.
भाजपा नेते असेही म्हणाले की, पक्ष विधानसभेत ९० पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो, असे वृत्त एएनआयने प्रसिध्द केले आहे.
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई म्हणाले, "आम्ही आसाममध्ये सकारात्मक निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही मतमोजणीच्या प्रत्येक फेरीवर लक्ष ठेवून आहोत.. आम्ही राज्यभरात निरीक्षक पाठवले आहेत, जेणेकरून कोणत्याही फेरीत प्रशासनाकडून काही कमतरता जाणवल्यास आम्हाला तात्काळ माहिती मिळेल... मतदानानंतर, आमच्या पथकांनी न वापरलेली ईव्हीएम्स खोल्यांमध्ये कुलूप न लावता ठेवलेली पाहिली... आमच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षानेही अशी काही प्रकरणे पाहिली.
आम्ही प्रशासनाकडून थोडा निष्काळजीपणा पाहिला आहे... आमच्या उमेदवारांना मारहाण झाली, तरीही निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. आम्ही भाजप सरकारचे एजंट म्हणून काम करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांबद्दल बोललो, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जेव्हा असे वातावरण असते, तेव्हा ते निवडणूक आयोगासाठी योग्य नाही..."
भाजप+ ८०
काँग्रेस+ २३
एआययूडीएफ+ २
Assam Election Results 2026 LIVE Updates : दिल्लीतील भाजपा मुख्यालयात तयार होत आहे.. पुरी आणि मिठाई
आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी लवकरच सुरू होणार असल्याने दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पुरी आणि मिठाई तयार केली जात आहे.
पाच राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांसाठीची मतमोजणीही आज केली जात आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपच्या अनेक विद्यमान मंत्र्यांनी घेतली आघाडी
निवडणूक निकालाचे कल हळूहळू समोर येऊ लागताच, आसाममधील अनेक मतदारसंघांमध्ये भाजप आघाडी घेत असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारसंघनिहाय सुरुवातीच्या कलानुसार, भाजपच्या अनेक विद्यमान मंत्र्यांना आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये जागीरोडमधून पीयूष हजारिका, गोलाघाटमधून अजंता निओग आणि टिंगखांगमधून बिमल बोरा यांचा समावेश आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : जोरहाटमध्ये गौरव गोगोई आघाडीवर
या निवडणुकीत जोरहाट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे गौरव गोगोई आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार हितेंद्र नाथ गोस्वामी यांचा सामना आहे.
तीन वेळा खासदार राहिलेले आणि सध्या लोकसभेत विरोधी पक्षाचे उपनेते असलेले गोगोई, २०२५ मध्ये आसाम प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवडले गेले आहेत.
त्यांनी अलीकडेच जोरहाटमध्ये आपले नशीब आजमावले असून आहे.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपला आसाममध्ये स्पष्ट बहुमत मिळवता येईल का?
आज सर्वांचे लक्ष भाजपाच्या जागांवर असेल. एक्झिट पोलच्या निकालांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपला निर्णायक जनादेश मिळेल, असे भाकीत केले आहे.
गेल्या दशकात आसाममध्ये भाजपची ताकद वाढत गेली असली तरी, १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत त्यांना अद्याप स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवता आलेले नाही. २०१६ मध्ये, जेव्हा पक्ष आसाममध्ये पहिल्यांदा सत्तेवर आला, आणि २०२१ मध्ये, जेव्हा तो दुसऱ्यांदा सत्तेवर परतला, या दोन्ही वेळी पक्षाने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा पार करत ६० जागा मिळवल्या.
लोअर आसाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम आसाम प्रदेशात, विशेषतः २०२३ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत मतदारसंघांची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना झाली. हा तोच प्रदेश होता जिथे २०२१ मध्ये काँग्रेस आणि तिचा तत्कालीन मित्रपक्ष एआययूडीएफने लक्षणीय विजय नोंदवले होते. सुधारित निवडणूक नकाशाचा परिणाम प्रतिनिधित्वातही होतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Assam Election Results 2026 LIVE Updates : भाजपने ५९ जागांवर घेतली आघाडी
भाजप+ ५९
काँग्रेस+ १८
एआययूडीएफ+ १
Assam Election Results 2026 LIVE Updates, BJP vs Congress

आसाम निवडणूक निकाल २०२६ लाईव्ह: भाजप वि काँग्रेस लढत ट्रेंड्स, विजेत्यांची यादी, मतमोजणी अपडेट्स (संग्रहित छायाचित्र)
